महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सध्या सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागपूर विभागातील भाजपच्या आमदारांसोबत बैठक घेऊन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. ही बैठक मुंबईतील विधान भवनात पार पडली.
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) यंदा ८ डिसेंबरपासून उपराजधानी नागपुरात भरवले जाणार आहे. गुरुवारी मुंबईत विधानभवनात झालेल्या कार्यमंत्रणा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते.
नागपूरमधील (Nagpur) ऐतिहासिक विधानभवन परिसर लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराच्या विस्तारीकरणाचा आणि नव्या प्रशासकीय इमारतींचा सविस्तर आराखडा बुधवारी मुंबईतील विधानभवनात सादर करण्यात आला.
नागपूरमध्ये (Nagpur) युनियन बँकेच्या वर्तनामुळे राज्यभाषा मराठीचा अपमान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना केवळ एफआयआर मराठीत असल्याचं कारण देत विमा भरपाई नाकारण्यात आली. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संतप्त प्रतिक्रिया देत बँकेविरोधात आंदोलन छेडले.
उत्तर भारतीय पंचांगानुसार सुरू झालेल्या श्रावण (Shravan) महिन्याच्या पहिल्या सोमवारला नागपूरात भक्तिभावाने भारलेलं दृश्य पाहायला मिळालं. शहरातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रस्त्यांवर रांग लागली होती. 'ॐ नमः शिवाय'च्या घोषात मंदिर परिसर दुमदुमला होता.
CM Fadnavis tour of constituencies is scheduled for municipal elections | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांची घोषणा जवळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, राजकीय पक्षांनीही संघटनबांधणीला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत मनपा निवडणुकांच्या तयारीचा नारळ फोडला आहे.
सिगारेटप्रमाणेच आता समोसा आणि जलेबी (Jalebi) खाण्यावरही आरोग्याचा इशारा देणारा फलक दिसणार आहे. तेल आणि साखरेचा अतिवापर शरीरासाठी किती घातक असतो, याविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी एम्स नागपूरकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkar) यांनी रविवारी खामला येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. या दरम्यान नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदन सादर करत आपली व्यथा मांडली. उपस्थित अधिकाऱ्यांना गडकरींनी प्रत्येक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाईचे निर्देश दिले.
“तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा, मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही शक्य आहे,” असे सांगत नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल (Dr Ravindra Singhal) यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. एका विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत ड्रग्सविरोधी मोहिमेचा ठाम पवित्रा पुन्हा स्पष्ट केला.
नागपूर महानगरपालिकेकडे राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या ३१० कोटी रुपयांच्या निधीचा वापर अद्याप न झाल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनपामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाला कामांचे प्रस्ताव त्वरित पाठवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
शहरातील मद्यधुंद वाहनचालकांविरोधात ट्राफिक विभागाने राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U Turn) या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. १० जुलैपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण १,३३९ वाहनांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ३३६ जण नशेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळले.
नागपूर सेंट्रल जेलमधील (Nagpur Central Jail) कैद्यांमधील वाद विकोपाला जात असून बुधवारी पुन्हा एकदा अति क्रूर प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर दातांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
नागपूर (Nagpur) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-५ ने भाजीपाला वाहतुकीच्या आड गांजाची मोठी खेप नागपूरमध्ये आणणाऱ्या टोळीवर कारवाई करत तब्बल १०६ किलो गांजा जप्त केला आहे. सुमारे ४१.५० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत पोलिसांच्या हाती लागला आहे.
शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या क्वालिटी वाईन शॉपवर (Quality Wine Shop) काही अज्ञात व्यक्तींनी काल रात्री थरारक पद्धतीने शस्त्रांनसह हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीस अटक केली असून एक अल्पवयीन मुलाला चौकशीनंतर सोडून देण्यात आले आहे.
देशातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळू शकतो. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीत झालेल्या एनर्जी डायलॉग 2025 या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, "जर कच्च्या तेलाच्या किंमती सध्याच्याच पातळीवर राहिल्या, तर येत्या तिमाहीत इंधनाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ जुलै २०२५ रोजी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांतून देशातील शेतकऱ्यांसाठी आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी मोठे पाऊल उचलले आहे. विशेषतः "प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना" (PMDDKY) या नव्या योजनेस मंजुरी देत, सरकारने शेतकरी कल्याणासाठी २४,००० कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे.
भारतासाठी अभिमानास्पद क्षण ठरवणाऱ्या मोहीमेत, अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubanshu Shukla) आपल्या तीन सहकाऱ्यांसह आज यशस्वीपणे पृथ्वीवर परतले. ड्रॅगन अंतराळयानाने कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ समुद्रात सुरक्षित लँडिंग करत मोहिमेचा यशस्वी शेवट साधला.
भारतात गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय नवनवीन मार्गांचा अवलंब करत असून, आता तिने नेपाळमार्गे हेरगिरी करण्याचा कट आखल्याचं उघड झालं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येत आहे. FATF (Financial Action Task Force) ने या हल्ल्यासाठी आर्थिक पुरवठा झाल्याचे स्पष्ट संकेत देत पाकिस्तानला फटकारलं आहे.
इराणमधील (Iran) तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी तिथे अडकले असून, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरू केल्याने देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागपूर शहरात अपघातांची संख्या झपाट्याने वाढत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लॅक स्पॉट्स म्हणजेच अपघातप्रवण ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके (Praveen Datke) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत केली.
राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असताना, परभणी जिल्ह्यातून काँग्रेससाठी (Congress) चिंतेची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या जिल्हाप्रमुख असलेले सुरेश वरपूडकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हनीट्रॅपमुळेच कोसळले, असा दावा त्यांनी केला असून, एकनाथ शिंदेंच्या नाशिकमधील कथित प्रकरणाची सीडी आमच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या भाजपसोबतच्या (BJP) संभाव्य विलिनीकरणावर मौन न राखता स्पष्ट भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, अद्याप विलिनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. मात्र भविष्यात असा निर्णय घ्यायचा झाल्यास, तो भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानंतरच घेतला जाईल.
राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला असतानाच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी दिलेली भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
विधानभवनातील तणावपूर्ण वातावरण आणि झालेल्या धक्कादायक घटनांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली असून, विधानसभा अध्यक्षांची मंजुरी घेऊन ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे
राज्य विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी झालेल्या गोंधळाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अत्यंत रोष व्यक्त केला आहे. विधीमंडळाच्या सभागृहातील वादांमधून निर्माण होणारी धक्काबुक्की आणि दंगल यावर टीका करताना त्यांनी भविष्यात विधानभवनात खूनसुद्धा होऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
राज्याच्या राजकारणात मोठी हलचल निर्माण करणारी घडामोड आज समोर येणार आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही भेट विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयात ठरणार असून, उद्धव ठाकरे आधीच तेथे दाखल झाले आहेत.
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुंबईच्या विकासकामांवरून, विशेषतः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकरणावरून शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीनंतर अजूनपर्यंत इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाही. मात्र शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अलीकडेच या बैठकीची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या या सूचनेची दिल्ली पातळीवर दखल घेण्यात आली असून, लवकरच इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचे संकेत समोर आले आहेत.
बॉलिवूडमधील लाडकी जोडी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांच्या घरी आज एक खास आनंदाचा क्षण उजाडला आहे. १६ जुलै २०२५ रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, हे कपल आता पालक झाले आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराची सामान्य प्रसूती झाली असून आई-बाळ दोघीही ठणठणीत असल्याचे समजते.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) खान तिच्या फॅशन आणि स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिने चांदीची मराठमोळी कोल्हापुरी चप्पल घातलेली होती. करीना सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवते असून, तिथून तिने एक आरामदायी फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या पायात चपला दिसत आहेत.
लोकप्रिय मॉडेल, अभिनेत्री आणि २००२ मध्ये गाजलेल्या ‘कांटा लगा’ रिमिक्समुळे संपूर्ण देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अवघ्या ४२व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात शाळांमधील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने एक वेगळीच भूमिका घेतली आहे. तिने मराठी भाषेतील एक विनोदी रील शेअर करून भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का देणारा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतला आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या भवानी सहकारी बँकेवर आरबीआयने गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेऊन बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत.
मंगळवार, ८ जुलै रोजी सोन्या (Gold) -चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ५९९ रुपयांनी वाढून ९७,१९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून, जीएसटीसह याची किंमत १,००,११० रुपये झाली आहे. चांदीतही १,१५९ रुपयांची मोठी उसळी नोंदवली असून ती १,१०,९२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या 55 टक्के असलेला DA वाढून 59 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळातील अंतिम वाढ ठरू शकते.
राज्यात १ जुलै २०२५ पासून नव्या वाहन कर (Vehicle tax) प्रणालीचा अंमल सुरू झाला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऑनरोड किंमत वाढणार आहे. विशेषतः सीएनजी व डिझेल वाहनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिक झळ बसेल.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-19 वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवला, पण खरी चर्चा झाली ती सूर्यवंशीच्या तुफानी खेळीची.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.