Tenth results announced girls topped this year too | राज्यभरातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदा राज्याचा सरासरी निकाल ९४.१० टक्के लागला आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला.
कोराडीमधील संघदीप बुद्ध विहारात बुद्धपौर्णिमा (Buddha Purnima) निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भगवान गौतम बुद्धांना सादर वंदन करून शांती, दया आणि विवेक या त्यांच्या शिकवणीचा गौरव केला.
भारत (India) -पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रशासनिक विभागांनी अधिक सजग राहावे, अशा सूचनांसह आज नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक आढावा बैठक पार पडली.
वाडीतील दत्तावाडी भागात भटक्या कुत्र्यांच्या (Stray dogs) वाढत्या त्रासाने नागरिक भयभीत झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, स्वरूप विजय मेश्राम या ६ वर्षीय बालकावर तीन भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवला. तो घराच्या बाहेर खेळत असताना ही घटना घडली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान (Weather) सतत बदलत आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये आता वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ९ मे रोजी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह वीजांच्या गडगडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) च्या दरम्यान भारताने केलेल्या जोरदार ड्रोन हल्ल्यात, नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजने विकसित केलेल्या ‘नागास्त्र’ ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. या कारवाईत ‘नागास्त्र’ने आपली क्षमता सिद्ध करून भारतीय लष्करासाठी एक विश्वासार्ह अस्त्र ठरले आहे.
सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी केरळमधील पत्रकार रेजाज एम. शिबा सिद्दीकी याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर देशविरोधी विचार पसरवल्याचा आणि जनतेमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा आरोप आहे.
उपराजधानी नागपूरच्या एनएच ४७ वर कोराडी नाक्यावर (Koradi Naka) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाई (Y) आकाराचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाला २० जूनपासून सुरुवात होणार असून, ८ महिन्यांत ते पूर्ण होईल.
भारताने पाकिस्तानातील दहशतवादी केंद्रांवर अचूक हवाई हल्ले करत 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सडेतोड प्रतिउत्तर दिले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
शहरातील बजाजनगर पोलीस ठाण्यात शिंदेसेनेच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला उद्योजिकेने (Female industrialist) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विनयभंग, फसवणूक, धमकी आणि अश्लील वर्तनाच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपी सध्या फरार आहे.
Sex racket operating in Delight Spa in Nagpur exposed | शहरातील साऊथ अंबाझरी रोडवरील डिलाइट स्पामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखा युनिट 1 ने छापा टाकून भांडाफोड केली. मंगळवारी, 13 मे रोजी दुपारी सुमारे 4.15 वाजता ही कारवाई करण्यात आली. स्पा श्रध्दानंदपेठ परिसरातील इंडियन बँकेजवळ आहे.
Man murdered his girlfriend in Nagpur | शहरातील दाभा परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागपूरकर सुन्न झाले. संशयाच्या गर्तेत अडकलेल्या एका युवकाने आपल्या प्रेयसीचा बेधडक खून केला. मृत महिला हेमलता वैद्य (३४) या एका नामांकित बिल्डरच्या ऑफिसमध्ये कार्यरत होत्या. आरोपी अक्षय दाते (२६) हाच तिचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते.
शहराच्या प्रसिद्ध जीरो माईल (Zero Mile) परिसरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे नागपूर शहरातील नागरिक चिंतित झाले आहेत. ६० वर्षांच्या मानसिक अस्वस्थ आणि बेघर महिलेचा मृतदेह एका स्थानिक युवकाच्या माहितीवरून पोलिसांनी ताब्यात घेतला.
अलीकडील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या (Indian Army) मजबुतीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण क्षेत्रासाठी ५०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा निधी केवळ शस्त्रास्त्रांच्या खरेदीपुरता मर्यादित न राहता, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्याबाबत केलेल्या थेट वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीर दौऱ्यावर असताना त्यांनी सैनिकांशी संवाद साधताना पाकिस्तानकडील अण्वस्त्रांचा विषय उपस्थित केला.
मराठा (Maratha) समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादाला आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची दिशा दिली आहे. महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग (एससीबीसी) म्हणून समावेश करून १० टक्के आरक्षण जाहीर केले होते.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढला होता. त्या वेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थीचा दावा केला होता.
भारतविरोधात सातत्याने खोटा प्रचार करणाऱ्या चीनच्या सरकारी माध्यमावर भारताने मोठी कारवाई केली आहे. ‘ग्लोबल टाईम्स’ (Global Times) या चीनच्या अधिकृत मुखपत्राचं X (माजी ट्विटर) वरील अकाउंट भारतात बंद करण्यात आलं आहे. या अकाउंटद्वारे भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अंतर्गत विषयांवर दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती.
शनिवारी पहाटे भारताकडून पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांवर हल्ले सुरु असतानाच पाकिस्तानात भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले. यामुळे तणावाखाली असलेल्या नागरिकांमध्ये आणखी घबराट निर्माण झाली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नव्या पुस्तकाने आधीच चर्चेचा केंद्रबिंदू गाठला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी अनेक राजकीय घडामोडींचे नवे पैलू उघड करत खळबळ उडवून दिली आहे. हे पुस्तक शनिवारी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित होणार असले तरी, त्यातील काही भाग आधीच माध्यमांमध्ये चर्चेत आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले विधान सध्या जोरदार चर्चेत आहे. पवारसाहेबांनी हिमालयावरून उडी मारायला सांगितले, तरी मी मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचराभूमीची जागा देण्याच्या निर्णयावरून मुंबईतील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि दिव्यांगांना अधिक मानधन मिळावं, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने नागपुरात बुधवारी जोरदार रक्तदान आंदोलन (Blood donation protest) केलं. हे आंदोलन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवास्थानाबाहेर पार पडलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील गोटात मोठा भूकंप झाला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी आपल्या पदाचा अनपेक्षित राजीनामा सादर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे पाठवत पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्यासंबंधीच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरणात संभ्रम निर्माण केला असतानाच, पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या चर्चांवर प्रकाश टाकत स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की, गटविलीनीकरणाबाबत पक्षपातळीवर कुठलाही निर्णय किंवा चर्चा अद्याप झालेली नाही, ही संपूर्ण चर्चा फक्त माध्यमांपुरती मर्यादित आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अभिनेत्री राखी सावंतवर तीव्र टीका करत देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना देशातून हाकलून देण्याची मागणी केली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. सर्वच पक्ष मुंबई महापालिकेवरील (BMC) नियंत्रण मिळवण्यासाठी रणनीती आखत आहेत. अशा वेळी ठाकरे गटासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा निर्णय देशहितासाठी नव्हे तर निव्वळ राजकीय स्वार्थासाठी घेतला गेला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे भारताच्या सुरक्षेसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
प्राईम व्हिडीओने नेहमीच दर्जेदार वेब सिरीज (Web series) आणि चित्रपट सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. जिथे मनोरंजनाला सामाजिक समज आणि भावनिक खोलीची जोड मिळते. अशाच वेगळ्या आणि समर्पक कथा मांडणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आता एक नवीन रत्न समोर आले आहे . ‘ग्राम चिकित्सालय’ (Gram Chikitsalaya).
भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांच्यावर आता बायोपिक येणार आहे आणि या ऐतिहासिक प्रकल्पामागे आहेत अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी ज्यांनी यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे अविस्मरणीय सिनेमे दिले आहेत.
“तारे जमीन पर” च्या जादूला १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अनुभवण्याची वेळ आली आहे! आमिर खान (Aamir Khan) एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाले आहेत. आमिर खान त्याच्या बहुप्रतिक्षित फॅमिली एंटरटेनर ‘सितारे जमीन पर’ द्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतत आहे.
बॉलीवूडचा 'किंग' शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपल्या आगामी सिनेमाची जोरदार चर्चा करत आहे. 'किंग' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे, आणि यावेळी त्याच्या स्टारकास्टमध्ये आणखी एक मोठं नाव समोर आलं आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghels) यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (ता.10 मार्च) रोजी पहाटे धाड टाकली. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.ईडीकडून छत्तीसगडमधील एकूण 14 ठिकाणी छापे सुरु आहे.
16 Naxalites killed in an encounter| छत्तीसगडमधील गारियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादीही ठार झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
सोन्याचे (Gold) दर लवकरच मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या म्हणण्यानुसार, आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात १९ हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली असून, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कर्जदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे SBI कडून गृहकर्ज किंवा MSME कर्ज घेणाऱ्या लाखो ग्राहकांना त्यांच्या EMI मध्ये थेट फायदा होणार आहे.
आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Stock market) अत्यंत निराशाजनक ठरला आहे. कोविड काळानंतरची सर्वात मोठी घसरण आज नोंदवण्यात आली. निफ्टी तब्बल 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स 3000 अंकांनी खाली गेला. यामुळे 19 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवलाचा वायफळ झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एसटी महामंडळात (ST Corporation) नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Story of brother Yamraj and sister Yamuna । दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai won Irani Cup after 27 years | सर्वाधिक रणजी ट्रॉफी आपल्या नवी करणाऱ्या मुंबईने आता इराणी चषक वर नाव कोरले आहे. तब्बल २७ वर्षांनी मुंबई संघाने चमकदार कामगिरी करीत इराणी चषकावर कब्जा केला. शेष भारत विरुद्ध मुंबई असा सुरु असलेल्या सामना अनिर्णित ठरल्याने मुंबईकडे पहिल्या डावात आघाडी असल्याने मुंबईला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर (Cancer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल बमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला.
नेपाळमधील (Nepal) नागरिक पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा जीवही गेला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी (Meena Kumari) यांचा आज स्मृतिदिन. मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेहजबिन असे होते. कलेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट आणि पारशी रंगभूमीवरील कलाकार होते.