(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
गत सप्टेंबर महिन्यातील 13, 15, 18 आणि 20 सप्टेंबर रोजी सीए फाऊंडेशनची परीक्षा आणि सीए इंटरमिजिएट ग्रुप 1 ची परीक्षा 12, 14 आणि 17 सप्टेंबर रोजी झाली. सीए इंटर ग्रुप 2 ची परीक्षा 19, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी घेण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सीए गट 1 ची परीक्षा आता 3 नोव्हेंबरपासून तर गट 2 ची परीक्षा 9 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचा निकाल विद्यार्थी icai.nic.in वर त्यांचे निकाल पाहू आणि डाउनलोड करू शकतात. सीए निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे.
असा करा डाऊनलोड:
प्रथम icai.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी. सीए फाउंडेशन किंवा इंटर रिझल्ट लिंकवर क्लिक करा, तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका, निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सबजोआ मिळेल, तपशील क्रॉस-तपासा आणि डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट घ्या.