नागपूर (Nagpur) शहरात उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले असताना, ऊष्माघाताने तिघा अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शहरातील विविध भागांमध्ये हे प्रकार घडले असून, तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Bomb threat to HC Nagpur bench | मंगळवार, २२ एप्रिल रोजी नागपूरमधील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अज्ञात धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाल्या आणि संपूर्ण परिसरात कसून तपास सुरू करण्यात आला.
नागपूरच्या विधानसभा (Nagpur Assembly) भवन संकुलाच्या विस्तारासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. विधानसभेचे सभापती राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये विस्तार प्रकल्पाला गती देण्यावर भर देण्यात आला. आगामी काळात सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता, अधिक बैठक व्यवस्था आणि सुविधा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विदर्भातील (Vidarbha) हवामानाने उन्हाच्या तडाख्यात झपाट्याने वाढ केली आहे. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला. रविवारीचे तापमान 44.6 अंश नोंदवले गेले, जे शनिवारीच्या तुलनेत 0.7 अंशांनी कमी असले तरीही उन्हाचा तडाखा काहीसा कायम राहिला.
शहर पोलिसांनी हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी 'ऑपरेशन शोध' (Operation Search) ही विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम १७ एप्रिल ते १५ मे २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे.
Nagpur teacher recruitment scam fake Shalarth ID | विदर्भातील शिक्षण विभागात एका भीषण गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. तब्बल ५४० बनावट शिक्षक आयडी तयार करून २०१९ पासून शासकीय निधीचा अपहार केल्याचे उघड झाले असून, अंदाजे ५४०० कोटी रुपयांची लूट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या ‘पीएम सूर्य घर (PM Surya Ghar) मोफत वीज योजने’ अंतर्गत नागपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २६,५८८ घरांवर सौर प्रकल्प उभारण्यात आले असून, त्याद्वारे १०५.४५ मेगावॅट क्षमतेची वीज निर्माण होत आहे.
कामठी (Kamptee) रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर नागपूर ते हावडा मार्गावरील रुळावर रनाळा परिसरातील शहीद नगरजवळ, गुरुवारी पहाटे एका युवकाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
उमरेड (Umred) एमआयडीसीतील एमएमपी कंपनीत ११ एप्रिल रोजी झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर मृतांचा आकडा वाढतच आहे. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान करण तुकाराम शेंडे (वय २०) याने अखेरचा श्वास घेतला. नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (All India Marathi Natya Parishad) १००वे विभागीय नाट्य संमेलन २४ एप्रिलपासून २७ एप्रिलपर्यंत नागपुरमध्ये आयोजित केले जाणार आहे. चार दिवसीय या महोत्सवात व्यावसायिक नाटके, लोककला, बाल नाट्य, संगोष्ठी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज बिहार दौऱ्यावरून ठोस आणि कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता त्यांनी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
पहलगाममध्ये (Pahalgam) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चारही दहशतवाद्यांचे फोटो आता उघड झाले आहेत. लष्करी वेशात आणि AK-47 रायफल्ससह सज्ज असलेले हे दहशतवादी एका ठिकाणी उभे असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील लेफ्टनंट विनय नरवाल (Vinay Narwal) यांना वीरमरण आलं. काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या विनय यांच्या अचानक जाण्याने त्यांची पत्नी हिमांशी हादरून गेली आहे. तिच्या हातावरची मेहंदीही अजून न उतरलेली असतानाच हे दुःखद वार्तालाप घडले.
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम (Pahalgam) भागात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने देशभरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याचे सूत्रधार अद्याप समोर आले नसताना पाकिस्तानकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
म्यानमार (Myanmar) काल म्हणजचे शुक्रवारी 28 मार्च रोजी भूकंपाच्या तीव्र झटक्याने हादरले. यावेळी 1000 पेक्षा जास्त लोकांना मृत्यू झाल्याचे कळते आहे. या भूकंपाची तीव्रता ही 7.7 इतकी होती. त्यातून याचा झटका थायलँडलाही बसला आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचा सहकारी बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. यानंतर जगभरातून आनंद साजरा करण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात २६ जणांनी प्राण गमावले असून, मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश आहे. दोन परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाला आहे.
MNS organize a trip to Kashmir | पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अजूनही अनेक प्रवासी तिथे अडकलेले आहेत. यामुळे काश्मीरमध्ये जाण्याचे बुकिंग मोठ्या प्रमाणात रद्द होऊ लागले आहे.
Sanjay Raut questions working methods of grand alliance govt | काश्मीरमध्ये घडलेल्या भीषण हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोकमय वातावरण आहे. मात्र अशा गंभीर प्रसंगी महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्षांमध्ये श्रेय मिळवण्यासाठी सुरू असलेल्या चढाओढीमुळे राजकीय वादाला पुन्हा हवा मिळाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, शासनाच्या एका सुरात काम न करण्याच्या वृत्तीवर कडवट शब्दांत टीका केली आहे.
पर्यटनासाठी काश्मीरमधील पहलगामला (Pahalgam) गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामध्ये पुण्याचे कौस्तुभ गणबोटे आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे हे देखील आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे पर्यटकांवर झालेल्या निर्घृण हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, या भीषण घटनेचा काही मंडळींकडून राजकीय हेतूने वापर होत असल्याचे दु:ख महसूलमंत्री आणि नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) भागात मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला.
राज्य सरकारवर आर्थिक अडचणींचा आरोप करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. "सपकाळ अजून शिकण्याच्या वयात आहेत. परिपक्वता यायला वेळ लागतो," असा टोला त्यांनी सोशल मीडियावर लगावला.
Aditya Thackeray on Raj Uddhav Thackeray come together again | महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा – ठाकरे बंधू पुन्हा एका व्यासपीठावर दिसणार का? मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिल्याने या राजकीय समीकरणांची शक्यता वाढली आहे.
राज्यातील मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक विधान केलं आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभू àमीवर त्यांना विचारण्यात आलं की, "तुम्ही रुह अफजा की गुलाब शरबत प्राधान्याने पिता?" यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, “मी रोज गोमूत्र घेतो. ते शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.”
काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) भागात झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटकांच्या धर्माची विचारपूस करून त्यांच्यावर बेधडक गोळीबार करण्यात आला. यात 28 जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार (Manoj Kumar) यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी (Meena Kumari) यांचा आज स्मृतिदिन. मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेहजबिन असे होते. कलेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट आणि पारशी रंगभूमीवरील कलाकार होते.
अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' सिनेमा 30 मार्चला सिनेमा गृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमात सलमान खानची प्रमुख भूमिका आहे. 'सिकंदर' निमित्ताने सलमानचा अनेक वर्षांनी बिग बजेट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने सगळ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते भूपेश बघेल (Bhupesh Baghels) यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (ता.10 मार्च) रोजी पहाटे धाड टाकली. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.ईडीकडून छत्तीसगडमधील एकूण 14 ठिकाणी छापे सुरु आहे.
16 Naxalites killed in an encounter| छत्तीसगडमधील गारियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादीही ठार झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
आजचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी (Stock market) अत्यंत निराशाजनक ठरला आहे. कोविड काळानंतरची सर्वात मोठी घसरण आज नोंदवण्यात आली. निफ्टी तब्बल 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स 3000 अंकांनी खाली गेला. यामुळे 19 लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवलाचा वायफळ झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एसटी महामंडळात (ST Corporation) नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Job opportunities for MSW students at Abhyudaya sewa exhibition | ग्रामायण प्रतिष्ठान सेवा संस्थांना अधिक सशक्त करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. यावेळी प्रतिष्ठानने एक विशेष उपक्रम आयोजित केला आहे - अभ्युदय: सेवा कार्याचे निःशुल्क प्रदर्शन. "चांगल्या कामांना समाजाची साथ!" या संकल्पनेवर आधारित, नागपूरमध्ये बहुतेक पहिल्यांदाच अशा प्रकारचे प्रदर्शन होत आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Story of brother Yamraj and sister Yamuna । दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai won Irani Cup after 27 years | सर्वाधिक रणजी ट्रॉफी आपल्या नवी करणाऱ्या मुंबईने आता इराणी चषक वर नाव कोरले आहे. तब्बल २७ वर्षांनी मुंबई संघाने चमकदार कामगिरी करीत इराणी चषकावर कब्जा केला. शेष भारत विरुद्ध मुंबई असा सुरु असलेल्या सामना अनिर्णित ठरल्याने मुंबईकडे पहिल्या डावात आघाडी असल्याने मुंबईला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर (Cancer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल बमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला.
नेपाळमधील (Nepal) नागरिक पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा जीवही गेला आहे.