राजकुमार राव–कीर्ती सुरेशची ‘रफ्तार’ २४ जुलैला प्रदर्शित होणार

    14-Mar-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री किर्ती सुरेश यांची बहुप्रतीक्षित ‘रफ्तार’ ही चित्रपट २४ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून, दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार असल्याने प्रेक्षकांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर यांनी केले असून निर्मिती अभिनेत्री पत्रलेखा यांनी त्यांच्या Kampa Films या बॅनरखाली केली आहे. हा चित्रपट Amazon MGM Studios यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी शनिवारी Instagram वर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अधिकृत प्रदर्शित दिनांक जाहीर केला. पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये, “महत्त्वाकांक्षेने जन्म घेतलेली ही कथा आता लालसेच्या कठोर परीक्षेला सामोरी जाणार आहे. ‘रफ्तार’ २४ जुलैला तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये,” असे नमूद करण्यात आले आहे.

मेकर्सच्या माहितीनुसार, हा चित्रपट महत्त्वाकांक्षा, प्रेम आणि लालसेच्या संघर्षावर आधारित रोमांचक कथानक मांडणार आहे. कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.

या चित्रपटात राजकुमार राव आणि कीर्ती सुरेश यांच्यासोबत अनुराग ठाकुर , रोहन वर्मा, तान्या आणि रजत कपूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांच्या मते, दमदार कलाकारांची फळी आणि वेगळ्या कथानकामुळे ‘रफ्तार’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकते.