अमरनाथ यात्रेला पुन्हा प्रारंभ

    02-Aug-2022
Total Views |
 

amarnath yatra (Image Credit: Internet)
 
श्रीनगर:
तुर्तास स्थगिती दिलेल्या अंबरनाथ यात्रेला मंगळवारी पुन्हा सुरुवात झाली आहे. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांनी यात्रेकरूंचा जत्था पवित्र गुहेकडे रावाना झाला आहे. त्याचवेळी जम्मूतील भगवती नगर येथून भाविकांचा जत्थाही मंगळवारी सकाळी बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी काश्मीरला रवाना झाला.
 
 
 
 
या पूर्वी सोमवारी खराब हवामानामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून अमरनाथ यात्रा थांबवली होती. अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख भाविकांनी पवित्र हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे. ही संपूर्ण यात्रा येत्या 11 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.