अमरनाथ यात्रा स्थगित; हेलिकॉप्टर द्वारे बचाव कार्य

    10-Jul-2022
Total Views |

amarnath yatra
( pic-@tw)
जम्मू:
 
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. या दुर्घटनेत १६ हुन आधीक जणांचा मृत्यू झाला असून, ४० जण जखमी तर, ४० हुन अधिक जण बेपत्ता आहेत. ढगफुटीनंतर अडकलेल्या १५ हजार भाविकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना पंजरणीच्या शिबिरात हलवण्यात आले. या दुर्घटनेमुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
 
 
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्यानंतर शुक्रवारी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ढगफुटीनंतर दरडी कोसळल्याने भाविकांचे तंबू वाहून गेले. कित्येक लोक मलब्याखाली दबले.
 
 
शोध आणि बचाव मोहिमेसाठी माऊंटन रेस्क्यू पथकाचा वापर केला जात असून, गस्त घालणारे पथक आणि श्वानांचाही वापर केला जात आहे. हवाई बचाव मोहीमही जोरात सुरु आहे. भाविकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. निरग्रार हेलिपॅड येथे लष्करी वैद्यकीय पथके जखमी झालेल्या भाविकांना उतरवून घेत आहेत. 
 
 
 
बचाव मोहिमेसाठी सीमा सुरक्षा दलाच्या एमआय- १७ हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. जम्मूकाश्मीर प्रशासनाने बचाव मोहिमेसाठी प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स तैनात केली आहे.
 
 
 
बालटाल येथे १६ मृतदेह हलवण्यात आले, अशी माहिती बीएसएफच्या दिल्ली येथील प्रवक्त्याने दिली. पवित्र गुहेच्या खालच्या भागापासून पंजतरणीपर्यंत मार्ग उघडण्यासाठी आयटीबीपीने काम सुरू केले आहे.