अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; ५ मृत्यू आकडा वाढण्याची शक्यता

    08-Jul-2022
Total Views |
amrnath
(img/internet) 
 
नवी दिल्ली: 
अमरनाथ गुहेजवळ मोठा अपघात झाला आहे. पवित्र अमरनाथ गुहेच्या तळाजवळ ढगफुटी झाल्याचे सांगितल्या जात असून, यात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. ढगफुटीची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या टीम बचावकार्यासाठी पोहोचल्या आहेत. ढगफुटीच्या दुर्घटनेच्या वेळी सुमारे दहा हजार भाविक गुहेभोवती उपस्थित असल्याचा अंदाज आहे.
 
 
शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. अमरनाथ गुहेच्या दोन किलोमीटरच्या परिघात ढगफुटीची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ढगफुटीनंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे भाविकांचे तंबू आणि सामानही मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याची माहिती आहे. सगळीकडे फक्त पाण्याचं दृश्य. बचाव पथके पोहोचून भाविकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत.