अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

17 Jul 2024 17:16:43

Will Ajit Pawar be rejoin with Sharad Pawar
 
 
पुणे :
विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आज पुण्यात त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी अनेक राजकीय घडामोडीवर भाष्य केले. यावेळी त्यांना अजित पवार स्वगृही परतणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.
 
हेही वाचा : अजित पवार गटात फूट: पिंपरी-चिंचवडच्या अनेक नेत्यांचा शरद पवारांच्या गटात प्रवेश
 
त्यावर, घरात सर्वांनाच जागा आहे, असं शरद पवार म्हमाले. तेव्हा, पक्षात अजितदादांना जागा असेल का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावरही पवारांनी तात्काळ उत्तर दिलं. पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबुतीने उभे राहिले त्यांना आधी विचारणार. घ्यायचं की नाही हे ते ठरवतील, असे पवार म्हणाले.
 
हेही वाचा : शरद पवार ॲक्शन मोडवर; नाशिकमधून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?
 
दरम्यान लोकसभेत अजित पवार गटाला मोठा फटका बसला.अनेक नेत्यांची शरद पवार गटात प्रवेश करण्यास सुरुवात केली. भुजबळ हेही महायुतीत खुश नसल्याचे, त्यांची होळसांड होत असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत . त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली असून ते परत आले तर त्यांना जागा देणार का असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0