अजित पवार गटात फूट: पिंपरी-चिंचवडच्या अनेक नेत्यांचा शरद पवारांच्या गटात प्रवेश

    17-Jul-2024
Total Views |
 
NCP Ajit Pawar and Sharad Pawar
 (Image Source : Internet)
 
पिंपरी :
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar group)  मोठी फूट पडली आहे. शरद पवारांनी अजिदादांच्या गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे खिंडार पाडले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख अजित गव्हाणे यांच्यासह नगरसेवकांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या मोदीबाग येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अजित पवार यांच्या नेतृत्वात गेलेले राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि पिंपरी चिंचवडमधील नगरसेवक पुन्हा शरद पवार यांच्या गटात परतले.
 
दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील अजित पवार गटाचे पिंपरी-चिंचवडचे विधानसभा अध्यक्ष आणि माजी शहर युवक अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. या पाठोपाठ आता अजित पवारांच्या चार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.