Care with Abhyuday: मुळव्याधीपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य आहार आवश्यक

    18-Jan-2023
Total Views |

Diet for Piles (Image Source : Internet/ Representative image)
 
नागपूर :
Care with Abhyuday : रोजच्या व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांना आपल्या खानपानाची योग्य काळजी घेणे शक्य होत नाही. याचा थेट परिणाम स्वास्थ्यावर होत असल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. मूळव्याध हा देखील विविध प्रकारच्या शारीरिक समस्यांपैकी एक आहे. मूळव्याध किंवा पाईल्स हा एक गंभीर आजार आहे, जो गुदाशय आणि गुदद्वारात सूज आल्याने होतो. यावेळी मुळव्याध असलेल्या व्यक्तींना हालचाल करणेही वेदनादायक ठरते. कधीकधी मलासह रक्त देखील पडते. अशावेळी मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी औषधांबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
 
मूळव्याधीचे दुखणे म्हणजे अवघड जागेचे दुखणे. मूळव्याध शस्त्रक्रियेशिवाय बरा होऊ शकतो, याबाबत 'अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटल'चे (Abhyuday Piles Laser Hospital) अनुभवी डॉक्टर डॉ. प्रवीण सहावे आणि डॉ. पूजा सहावे यांनी यापूर्वी आपल्याला माहिती दिली आहे. पण मूळव्याधीला मुळापासून बरे करण्यासाठी औषधे घेत असाल तर औषधांसोबतच योग्य आहाराकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. यावेळी काहीही खाऊन चालणार नाही. अशात डॉ. प्रवीण सहावे आणि डॉ. पूजा सहावे यांनी मूळव्याधीच्या त्रासादरम्यान घ्यावयाच्या आहाराविषयी माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया मूळव्याधीमध्ये औषधांबरोबर आहारामध्ये काय-काय खावे?
 
 
 
साधारणपणे मूळव्याध दोन प्रकारचे असतात
- अंतर्गत मूळव्याध
- बाह्य मुळव्याध
 
अंतर्गत मूळ झाला असेल तर आतड्यांच्या हालचालींसह रक्त बाहेर पडते. तर बाह्य मुळव्याधात गुदद्वाराभोवतीचा भाग सुजतो, ज्यामुळे तिथे दुखते आणि खाज येते.
 
Watch Video :
 
 
मुळव्याधात आहार काय घ्यावा?
कित्येकदा प्रश्न पडतो की मूळव्याध असेल तर नेमका कोणता आहार घ्यावा? मूळव्याधीवर उपचार म्हणून बऱ्याचदा विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाण्याचा आणि काही गोष्टी खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर बन्याचदा मुळव्याध असलेल्या लोकांना फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सांगतात. फायबर मलाला मऊ बनवतं, ज्यामुळे मल टोचत नाही. जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल, तर तुम्ही पाणी आणि फळांच्या रसांच्या स्वरूपात भरपूर पातळ पदार्थ पिऊ शकता.
 
मूळव्याध असेल तर असा आहार घ्यावा
 
भरपूर फळे खा
अँटीऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेली फळे आतड्यांची हालचाल सुधारतात. मूळव्याधाने ग्रस्त लोकांसाठी सफरचंद, द्राक्षे, जांभूळ यांसारखी फळे खाणे खूप फायदेशीर ठरते. ही सर्व फळे फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.
 
पूर्ण धान्य खा
मूळव्याधाच्या बाबतीत आपल्या आहारात तपकिरी तांदूळ, ओट्स, गहू सारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा. संपूर्ण धान्यामध्ये फायबरची खूप चांगली मात्रा आढळते. फायबरने मल मऊ होतो आणि आतड्यांच्या हालचाली दरम्यान वेदना कमी होते.
 
एखादे केळ रोज खावे
मुळव्याध असलेल्या व्यक्तीने केळ खाल्ले तर त्याला खूप आराम मिळतो. केळी गुदद्वाराची जळजळ कमी करून आतड्यांची हालचाल सुलभ करतात. बॅक्टेरियाच्या वाढीला रोखण्याच्या दृष्टीने मूळव्याधीच्या घरगुती उपचारांसाठी केळी एक उत्तम पदार्थ आहे.
 
भरपूर पाणी प्या
मूळव्याधासाठी आपल्या आहारात भरपूर पाणी असावे. यामुळे मल मऊ होऊन मूळव्याध लवकर बरा व्हायला मदत होते. त्यामुळे मूळव्याध असलेल्या व्यक्तीने दररोज किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
 
हिरव्या पाले भाज्या खा
मूळव्याध असेल तर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने पचन चांगले होत. ब्रोकोली, कोबी, गाजर, फुलकोबी आणि टोमॅटो मुळव्याधीच्या रुग्णांना खाण्यास सांगितले जाते. हा भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने मूळव्याधीचा त्रास वाढत नाही. जर तुम्ही मूळव्याधीचे रुग्ण असाल तर मुळ्याला तुमचा साथीदार बनवा. जर मुळा खाल तर हा आजार मुळापासून नाहीसा होईल.
 
फळांचा रस प्या
हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर विविध प्रकारचे ज्यूस प्यावेत. हे ज्यूस शरीरातील विष काढून टाकतात. याशिवाय त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स सूज आणि वेदना कमी करतात. ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी आणि चेरी सारखी फळे गुदाशय आणि गुदद्वारात असलेल्या शिरा बळकट करतात. म्हणून या फळांचा रस नक्की प्यायला हवा.
मूळव्याध असेल तर काय खाऊ नये
 
पांढरा ब्रेड खाऊ नका
मैद्याचे पांढरे ब्रेड पचायला खूप अवघड असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची शक्यता वाढते. म्हणून, मूळव्याध असलेल्या रुग्णांना ब्रेड खायला डॉक्टर्स मनाई करतात.
 
तळलेले पदार्थ खाऊ नका
जर तुम्हाला मूळव्याध असेल तर फ्रेंच फ्राईज, पुऱ्या, वडे आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा. खरं तर, तेलकट आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमुळे चरबी वाढते. यामुळे आपल्या पचन तंत्रावर दबाव टाकून पचन व्यवस्था कमकुवत होऊ शकते.
 
कॉफी जास्त नकोच 
मूळव्याधीच्या रुग्णांसाठी कॉफी हानिकारक आहे. त्यात असलेले कॅफिन डिहायड्रेशनचे कारण आहे. ज्यामुळे मल कडक होतो आणि गुदद्वाराच्या नसांवर दबाव येतो. ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये त्रास होऊ शकतो.
 
मूळव्याध होऊ नये यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात हे बदल करा
१. आपल्या आहारात फळे आणि भाज्या असे फायरसमृध्द असलेले अन्न खा.
२. दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. दररोज व्यायाम करा.
३. जास्त वेळ संडासला कुंथत बसू नका.
४. उशीर न करता लवकर संडासला जा.
५. जर तुम्हाला आतड्यांच्या हालचाली दरम्यान वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
६. मल पास करताना गुद्वारांच्या स्नायूंवर दबाव टाकू नका. यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
७. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी प्रत्येक आहारासह दही खाणे गरजेचे आहे.
८. निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी मन हे मूळव्याध बरे करण्याचे उत्तम मार्ग आहेत. 
 
मूळव्याध असेल तर वर सांगितलेला आहार घ्या. तसेच पथ्ये आणि अपथ्ये पाळून मूळव्याध नक्की बरा होईल. 
 
Abhyuday Piles Lazer Hospital 
 
पत्ता :
सेंटर १ : महापुष्प सोसायटी, लोहार समाज भवनाच्या मागे, शताब्दी नगर ते मनीष नगर रोड, नागपूर
सेंटर २ : रामेश्वरी बस स्टॉप जवळ, नागपूर
Contact : 9970743318
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.