Care of your Health with Abhyuday: मूळव्याधासाठी लेझर उपचार फायदेशीर; जाणून घ्या

    15-Nov-2022
Total Views |

treatment on piles
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
आजच्या दगदगीच्या जीवनात सर्वाधिक परिणाम होतो तो आपल्या आरोग्यावर. कार्यालयातील कामाचा व्याप असो वा घरातील दैनंदिन काम, दुर्लक्ष होते ते आपल्या खाण्यापिण्याकडे. अशावेळी आपल्या आहाराची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, रोजच्या व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांना हे शक्य होत नाही आणि याचा थेट आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्याच्या अनेक नवीन सामान्य उद्भवतात. अशात मूळव्याध हा देखील विविध प्रकारच्या शारीरिक आजारांपैकी एक आहे. मूळव्याध किंवा पाईल्स हा आजार काय आहे आणि त्यावर कसा उपचार करता येईल, हे आम्ही 'अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटल'चे अनुभवी डॉक्टर डॉ. प्रवीण सहावे आणि डॉ. पूजा सहावे यांच्याकडून जाणून घेतले.
 
मूळव्याध/पाईल्स म्हणजे काय?
गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात. विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित असे मुळव्याधाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात, त्या बाहेर येतात. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्यामुळे तेथे सतत ठणकल्यासारख्या वेदना होते. कधीकधी क्वचित रक्तस्राव देखील होतो. इतकेच नाही तर साधे उठता-बसताना देखील व्यक्तीचा मुळव्याधामुळे वेदना सहन कराव्या लागतात. अशावेळी व्यक्तीने अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे नक्कीच टाळले पाहिजे.
 
मूळव्याधीची प्रमुख कारणे
  • पोट साफ न होणे
  • थायरॉईड तसेच हार्मोन्समध्ये होणारे बदल
  • मसालेदार पदार्थ
  • मांसाहार करणे 
  • जन्मतः गुदभागातील नस सैल असणे
  • वर्षानुवर्षांपासून असलेले पोटाचे विकार
  • गुदभागी फोड येणे
  • बहुतेक स्त्रियांना मूळव्याध होण्याची शक्यता
 
मूळव्याधीची लक्षणे 
  • गुदभागातून रक्तस्राव होणे
  • जळजळ होणे
  • खाज सुटणे
  • पोट साफ न होणे
  • गुदभागातून कोंब बाहेर येणे,
  • मांस बाहेर आल्याने वेदना होणे,
  • आदीम रक्तस्राव झाल्याने सूज येणे 
  • चक्कर येणे
 
मूळव्याधीचे प्रकार
१. बाहेरील कोंब
२. आतील कोंब
 
आतील कोंब असलेल्या मूळव्याधीचे चार प्रकार
१. गुदभागातून रक्तस्राव होण
२. मांस बाहेर येणे-आत जाणे
३. गुदभागातील मांस हाताने आत टाकणे
४. गुदभागातून कोंब बाहेर येऊन तीव्र वेदना होणे 
 
 
 
दरम्यान, अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटलचे डाॅ. प्रवीण सहावे आणि डाॅ. पूजा सहावे हे जे मूळव्याध तज्ज्ञ असून त्यांनी या संदर्भात सर्वात सोपे उपचार सांगितले आहेत. लेझर किंवा बीम प्रक्रियेद्वारे मूळव्याधांवर सहज उपचार करता येतात, असे दोघांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे रुग्णाला उपचारासाठी जास्त काळ रुग्णालयात भरती राहावे लागत नाही. याशिवाय महिलांमध्ये होणारे नालीघाव (Fistula), फिशर इत्यादी आजारांवर आयुर्वेदिक क्षारसूत्र तसेच लेझरद्वारे उपचार केले जाऊ शकतात.
 
डॉ. पूजा सहावे या गर्भाशयाशी संबंधित आजार जसे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, अतिरक्तस्राव, वंध्यत्व, थायरॉईड इत्यादींवर उपचार करतात. याशिवाय चेहऱ्यावरील मस, चाम खीळ, शरीरावरील गाठी, केसांच्या समस्या, स्वच्छेने आजार, लठ्ठपणा यावर अभ्युदय हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध आहेत.
 
abhyuday piles hospital 
इतकेच नव्हे तर अत्याधुनिक सौंदर्य चिकित्सेमध्ये (Beauty Therapy) लेझर उपचाराचे मोठे महत्व आहे. ज्या महिलांना शिंक, खोकला करताना लघवी आपोआप यहोते, ज्यांची नॉर्मल प्रसूती (Delivery) झाली आहे, अशा महिलांना कॉस्मेटिक लेझर उपचाराचा चांगला फायदा होतो. यामध्ये कुठलाही चिरा, टाका नसतो. शिवाय रुग्णालयात भरती राहण्याची गरज नाही. मात्र, साईड इफेक्ट्समुळे अनेकांना याची भीती वाटते. पण यात घाबरून जाण्याचे आणि दुष्परिणाम होण्याचे कोणतेही कारण नाही, असे डॉ. प्रवीण सहावे आणि डॉ. पूजा सहावे यांनी सांगितले आहे.
 
विशेष ऑफर
अभ्युदय पाईल्स लेझर हॉस्पिटल १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान 'जागतिक मूळव्याध दिना'निमित्त लेझर उपचारांवर ५० टक्के विशेष सवलत देत आहे.
 
पत्ता :
सेंटर १ : महापुष्प सोसायटी, लोहार समाज भवनाच्या मागे, शताब्दी नगर ते मनीष नगर रोड, नागपूर
सेंटर २ : रामेश्वरी बस स्टॉप जवळ, नागपूर
 
तुम्ही या ऑफरचा नक्कीच लाभ घेऊ शकता.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.