शरद पवारांकडून मराठा आणि ओबीसी समाजात ठिणगी टाकण्याचे काम; लक्ष्मण हाकेंचा आरोप

    23-Jul-2024
Total Views |
 
Sharad Pawar Laxman Hake
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पार्टी) सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शरद पवारांकडून मराठा आणि ओबीसी समाजात ठिणगी टाकण्याचे काम सुरु असल्याचा आरोप हाके यांनी केला.
 
 
शरद पवार ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. आमच्या एसटीच्या आरक्षणासाठी चार पिढ्या खपल्या आणि आता शरद पवार म्हणत आहेत आमचा पाठिंबा आहे. त्यांनी एकदाची आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले.ते बीडच्या चकलंबा गावात ओबीसी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.
 
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसीत समाविष्ट करून घेऊ नका, अन्यथा मोठं आंदोलन करू,असे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटले. यासाठी त्यांनी ठिकठिकाणी ओबीसी मेळावे देखील घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी लक्ष्मण हाके हे बीडच्या चकलंबा गावात आले होते. यावेळी त्यांनी ओबीसी बांधवांना संबोधित करताना शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.