शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?

    22-Jul-2024
Total Views |
Meeting of Sharad Pawar and CM Eknath Shinde
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये अनेकी राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
 
मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांची भेट झाली. साधारण 1 तासाच्या या भेटीत 15 मिनिटे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. शरद पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली.
 
सरकारची ओबीसी आणि मराठा आरक्षणाची भूमिका काय याबाबत आम्हाला काहीच माहिती नसल्याचे पवार म्हणाले आहेत.
 
तसेच मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे, याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते अशी भूमिकाही त्यांनी घेतली होती.आजच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली, त्यामुळे आता विरोधी पक्ष याबाबतीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.