मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली 'लाडका भाऊ' योजनेची घोषणा

    17-Jul-2024
Total Views |

CM Eknath Shinde announced Ladka Bhau Yojana
 (Image Source : X)
 
नागपूर :
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर आता 'लाडका भाऊ' योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना राज्यातील तरुणंसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी असलेल्या योजनेची माहिती दिली.
 
या योजनेअंतर्गत 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील. या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल.
 
 
या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपले सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.