वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

    16-Jul-2024
Total Views |

Worli hit and run case
 
 
मुंबई :
वरळी येथील हिट ॲण्ड रन प्रकरणातील (Worli hit and run case) मुख्य आरोपी मिहीर शाह याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ७ जुलैला पहाटे वरळीत मिहीर शाह याने दुचाकीवरील नाखवा दाम्पत्याला धडक देत कावेरी नाखवा या महिलेला फरकटत नेले होते. यात अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल ६० तासांनी मंगळवारी शाहपूरमधून मिहीरला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याबाबत कबुली दिल्यानंतर सुरुवातीला त्याला १६ जलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानुसार त्याला आज शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.