वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

    10-Jul-2024
Total Views |
Worli Hit and Run
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
वरळी 'हिट अँड रन' (Worli Hit and Run) प्रकरणातील आरोपीचे वडील राजेश शाह हे पालघरमधील शिंदे गटाचे उपनेते आहेत. या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह फरार झाल्यानंतर पोलिसांनी राजेश शाह यांना ताब्यात घेतले होते. राजेश शाह यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वरळी हिट अँड रन अपघातानंतर राजेश शाह यांची शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
 
दरम्यान वरळी 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला अपघात प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. यात मिहिर शाह याची आई आणि बहिणीचा देखील समावेश आहे.