Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधी यांचा रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल

    03-May-2024   
Total Views |

Rahul Gandhi files nomination from Rae Bareli
 (Image Source : Twitter)
 
नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी ते आपल्या कुटुंबियांसह रायबरेली येथे पोहोचले. दरम्यान, भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दिनेश प्रताप यांनीही शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
 
 
राहुल गांधी आज सकाळी विशेष विमानाने दिल्लीहून फुरसातगंजला पोहोचले. तेथून अमेठीमार्गे ते रायबरेलीला आले. रायबरेली येथील हाती पार्क स्थित केंद्रीय काँग्रेस कार्यालयात पूजा केल्यानंतर राहुल यांची नामांकन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. फिरोज गांधी चौक मार्गे ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. या मिरवणुकीत मोठी गर्दी दिसून आली. कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. राहुल यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे काँग्रेसवाले बोलत राहिले. या मिरवणुकीत काँग्रेससोबत सपाचे कार्यकर्तेही दिसत होते.
 
 
 
रायबरेली म्हणजे गांधी घराण्याची परंपरागत जागा
दरम्यान, रायबरेली लोकसभा मतदारसंघ ही गांधी घराण्याची परंपरागत जागा आहे. फिरोज गांधींनी पहिल्यांदा 1952 मध्ये आणि नंतर 1958 मध्ये देखील निवडणूक लढवली आणि जिंकली. फिरोज गांधींच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींनी 1967 मध्ये येथून राजकीय इनिंगला सुरुवात केली. 2004 मध्ये इंदिरा गांधींच्या सून सोनिया गांधी यांनी निवडणूक लढवली आणि पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या. आता सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी हा वारसा सांभाळणार आहेत. 1998 मध्ये अशोक सिंह यांना उमेदवारी दिल्यावर भाजपने शेवटच्या वेळी येथे विजय मिळवला होता.
 
स्थानिक भाजप नेते अशोक सिंह यांनी 1996 आणि 1998 मध्ये सलग दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. 1999 मध्ये गांधी कुटुंबातील सहकारी सतीश शर्मा यांनी काँग्रेसला पुन्हा येथे आणले. 2004 मध्ये सोनिया गांधी यांनी या जागेवरून काँग्रेसची कमान हाती घेतली आणि त्यानंतर 2019 पर्यंत इथून विजयाचा सिलसिला सुरू ठेवला. मात्र, यावेळी त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत राज्यसभेचा मार्ग निवडला. आता पक्षाने राहुल गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवार म्हणून घोषित केले आहे.