नागपूर :
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे ही आदर्श व्यक्तिमत्व यांचे प्रतीक होते. त्यांच्याच या व्यक्तिमत्वाला आज नागपुरतील नागपुरातील भोसले व्यायाम शाळा घडविण्याचा प्रयत्न करीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मर्दानी खेळ आणि त्यांची युद्ध कला आणि त्याद्वारे आपसूक घडणारे व्यक्तिमत्व हे हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कुठे तरी मागे पडले आहे. नागपुरातील भोसले व्यायाम शाळेने शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक खेळ आणि त्याचा वारसा पुढे नेण्याचे ठरविले असून, हा मर्दानी खेळांचे निःशुल्क प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
शिवकालीन युद्धकला म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पारंपारिक मार्शल आर्ट असून, ही माणसाला परिपूर्ण बनविणारी आणि एक आदर्श व्यक्तिमत्व घडविणारी एक कला आहे. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी, भाला, माडू, लाठीयुद्ध अशा मर्दानी खेळांचा या कलेत समावेश हाेताे.
मर्दानी खेळ ही आजच्या काळाची गरज बनली असून, स्वसंरक्षण कसा करावे, हे या कलेतून आपल्याला शिकायला मिळते. अशातच नागपुरातील भोसले व्यायाम शाळा या आखाड्याने पुढाकार घेत गेल्या ८-१० वर्षांपासून कोणतेही शुल्क न आकारता सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आयोजित मर्दानी खेळ स्पर्धेत या आखाड्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून उत्तम कामगिरीची नोंद केली आहे.
डॉ. संभाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले व्यायाम शाळेत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. डॉ संभाजी भोसले यांच्या संकल्पनेतून या आखाड्याची सुरुवात झाली. येथे जवळपास ८ ते १० वर्षांपासून विद्यार्थ्यांना येथे निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. ५ ते ५० वर्षे वयोगटातील विद्यार्थी येथे मर्दानी खेळाचे धडे गिरवले जात असल्याचे प्रशिक्षक जिनेत भिमटे यांनी सांगितले.
तसेच हर्षल डवरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, शिवकालीन युद्धकलेचा प्रचार व प्रसार लोकांपर्यंत पोहोचावा, तसेच हा केवळ आपला इतिहास नसून, या कलेला जपण्यासाठी डॉ. संभाजी भोसले यांनी घेतलेला पुढाकार होऊ. आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील या युद्धकलेचे महत्व कळावे आणि या कलेचा वारसा पुढे नेण्यात यावा, यासाठी येथे निःशुल्क मर्दानी खेळाचे प्रशिक्षण येथे दिले जात आहे. स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (School Game Federation of India) ने या खेळाला मान्यता दिली आहे.
समाजातील युवकांना आणि मुलांना घडवण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी कला जोपासली आहे, तिला पुनर्जीवन देण्यासाठी आणि तिचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने निःशुल्क शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. शिवरायांचे नाव घेतल्याबर जशी आपल्याला उरात स्फूर्ती येते, तशीच ऊर्जा शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेल्या शस्त्रांना हात लावल्यावर जाणवते. समाजातील युवकांना आणि मुलांना घडवण्यासाठी, त्यांना या कलेपासून अवगत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच आतापर्यंत जवळपास १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना भोसले व्यायाम आखाड्यातून प्रशिक्षण घेतले असून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्या कलेचे प्रदर्शन केले असल्याचे डॉ. संभाजी भोसले यांनी सांगितले.
मर्दानी खेळाचा इतिहास
मर्दानी खेळ 15व्या-16व्या शतकात मराठ्यांच्या काळात विकसित झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या प्रचंड सैन्याचा मुकाबला करण्यासाठी गनिमी युद्ध पद्धती सुरू केली. शिवाजी महाराज स्वतः तलवार, बागनख, विच्छा इत्यादी शस्त्र युद्धात पारंगत होते. त्यांचे आवडते शस्त्र म्हणजे भवानी नावाची तलवार. त्यांनी याच युद्धकलेचा जोरावर त्यांनी शत्रूंना गुडघे टेकविण्यास भाग पडले. केवळ पुरुषच नाही तर या काळातून लहानमुलांपासून ते स्त्रियांपर्यंतचा प्रत्येक जण ही कला आत्मसात करत होता.