नागपुरातील बेसा परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथील घोगली रोडवर असलेल्या एका फॅक्ट्रीमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
बघा व्हिडिओ:
शहरातील बेसा चौक घोगली रोडवरील स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या वैद्य इंडस्ट्रीज नावाच्या फॅक्ट्रीमध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. वैध कारखान्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाहता पाहता ही आग रौद्र रूप धारण करत संपूर्ण फॅक्ट्रीमध्ये पसरली. आगीची माहिती मिळताच महापालिकेचे तीन आणि मिहानचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. घटनेच्या वेळी कारखान्यात 200 लोक काम करत होते. ज्वाळा वाढताच सर्व कामगार सुखरूप बाहेर आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.