महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! अशोक चव्हाण ११ आमदारांसोबत भाजपच्या वाटेवर?

    12-Feb-2024   
Total Views |

Ashok Chavan
(Image Source : Internet)
 
मुंबई :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांच्या या राजीनाम्याची महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
 
 
 
लोकसभा निवडणुका आणि राज्य निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र युनिटला आज आणखी एक धक्का बसला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असले तरी त्यांच्याकडून आतापर्यंत कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केल्याचे वृत्त पुढे येत असून, ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
भाजपमध्ये जाण्याची शक्यता
अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजप कार्यालयात जाऊन औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काही सूत्रांकडून केला जात आहे, त्याचासह कॉंग्रेसचे ११ आमदार देखील असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच मिलिंद देवडा आणि बाबा सिद्दीकी यासारख्या दिग्गज नेत्यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. आता अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानल्या जात आहे.
 
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी दिली प्रतिक्रीया
अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या राजीमान्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ते म्हणाले, अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला माहिती नाही. माझ्याशी चर्चा झाली नाही. मी २००७ पासून त्यांच्याबरोबर काम केले आहे. त्यांनी राजीमाना दिला तर मीही पक्ष सोडून जाईल कदाचित अशी चर्चा होती. परंतु, मी माझ्या मतदारसंघात फिरत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
 
 
 
अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... 
मी यापूर्वी अनेकवेळा सांगितले आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. समन्वय घडविण्यासाठी काँग्रेस समर्थ नाही, अंतर्गत धुसफूस आहे. काँग्रेसमधील आणखी मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसमध्ये अस्वास्थ्यत आहे. बाबा सिद्दीकी, मुरली देवडा आले आहे. अशोक चव्हाण राज्यसभा निवडणूक भाजपकडून लढणार असल्याचे माझ्याकडे आतापर्यंत कुठलाही प्रस्ताव नाही. मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोणी ही आले तरी आमचा दुपट्टा तयार आहे. विचारधारा स्वीकारत असेल तर त्याचे स्वागत आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.