Nagpur South West Assembly Constituency : देवेंद्र फडणवीस की प्रफुल्ल गुडधे? दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

    09-Nov-2024   
Total Views |
 
Devendra Fadnavis and Prafulla Gudadhe
 
 
एबी न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी संपूर्ण महाराष्ट्रासह सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत विषय मिळवण्यासाठी आपापल्या परीने जय्यत तयारी सुरु आहे. नागपुरात देखील सहा विधानसभा मतदार क्षेत्रातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रचार प्रसार करत आहेत. अशातच नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल गुडधे (पाटील) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचार प्रसार करण्यास सुरुवात केली आहे.
 
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ (Nagpur South West Assembly Constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. 2009 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. आता नॅशनॅलिस्ट काँग्रेसने पक्षाने काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे (पाटील) यांना या मतदार संघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध मैदानात उरातले आहे.
 
या निवडणुकीत परिस्थिती काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा नागपूर दक्षिण-पश्चिममधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रफुल्ल विनोद गुडधे (पाटील) नशीब आजमावत आहेत. 2014 मध्येही या जागेवर हे दोन्ही उमेदवार आमने-सामने होते. यावेळी नागपूर दक्षिण-पश्चिम जागेसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.
 
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा इतिहास
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात एकूण 12 मतदार संघांचा समावेश आहे. यात काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड (एससी), कामठी, रामटेक सह नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम हे मतदारसंघ आहेत. आज आपण प्रामुख्याने नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाच्या इतिहासाबद्दल बोलायचे तर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ही जागा अस्तित्वात आली.
 
खरं तर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वर्धा रोडवरील मिहानच्या पुनर्वसनात गेलेल्या शिवणगाव, सोनेगावपासून तर अंबाझरी तलावापासून मेडीकल चौकापर्यंत असे क्षेत्र येते. सुरुवातीला येथे पश्चिम नागपूर मतदारसंघ होता आणि येथूनच 1999 मध्ये देवेंद्र फडणवीस 1999 पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या अशोक धवड यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. त्यानंतर 2004 मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर 2008 मध्ये मतदारसंघाची पुनरर्चना झाली आणि दक्षिण-पश्चिम नागपूर असा एक नवीन मतदारसंघ तयार झाला.
 
नागपूर दक्षिण-पश्चिम जागा कोणी जिंकली?
नागपूर दक्षिण-पश्चिम जागेवर 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक झाली होती. त्यात भाजपने देवेंद्र फडणवीस यांना येथून उमेदवार केले होते. तर काँग्रेसने विकास ठाकरे फडणवीसांच्या विरुद्ध उभे केले होते. निकाल फडणवीस यांच्या बाजूने लागला आणि त्यांनी 27,775 मतांनी निवडणूक जिंकली. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना 89,258 मते मिळाली होती तर विकास ठाकरे 61,483 मतांसह निवडणुकीत अपयशी ठरले होते. 2009 पासून देवेंद्र फडणवीस सलग या मतदारसंघातून निवडून येत आहेत. देवेंद्र फडणवीस सलग तिसऱ्यांदा आमदार झाले पण त्यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून पहिल्या दोन निवडणुका जिंकल्या होत्या.
 
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचे तर 1992 मध्ये त्यांची राजकीय कारकीर्द अगदी लहान वयात सुरू झाली. 1992 मध्ये ते नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सलग दोन वेळा त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रमही फडणवीस यांच्या नावावर आहे. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा नागपूरचे महापौरही होते. त्यानंतर 1999 मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला, जो अजूनही सुरू आहे.
 
1999 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार झाले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे अशोक धवड यांचा 9087 मतांनी पराभव करून पहिल्यांदाच आमदार झाले. पुढच्या निवडणुकीतही ते नागपूर पश्चिम मतदारसंघातून भाजपचे उमेदवार झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंदबाबू देशमुख यांचा पराभव केला. यावेळी फडणवीसांच्या विजयाचे अंतर 17,610 मतांनी वाढले.
 
2014 मध्ये फडणवीस महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री
आता पुन्हा नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभेच्या जागेवर येत आहोत. 2009 नंतर 2014 मध्येही याच जागेवरून देवेंद्र फडणवीस भाजपचे उमेदवार झाले. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोद गुडधे (पाटील) यांचा पराभव केला. अशाप्रकारे फडणवीस सलग चौथ्यांदा आमदार झाले आणि पुन्हा एकदा विजयाचे अंतर 58,942 मतांनी वाढले. या निवडणुकीत 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपला 122 जागा मिळाल्या, तर मित्रपक्ष शिवसेनेला 63 जागा मिळाल्या. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री बनले.
 
गेल्या महाराष्ट्र निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून नशीब आजमावले. या निवडणुकीत त्यांचा सामना काँग्रेसचे डॉ. आशिष देशमुख यांच्याशी झाला. ही निवडणूक लढतही फडणवीस यांच्या नावावर होती आणि यावेळी ते ४९ हजार ३४४ मतांनी विजयी झाले. मात्र, 2014 च्या तुलनेत यावेळी त्यांच्या विजयाचे अंतर कमी होते.
 
कोण आहे प्रफुल्ल गुडधे?
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार झालेले प्रफुल्ल गुडधे (पाटील) हे सध्या नागपूर महापालिकेचे नगरसेवक आहेत. ते प्रभाग क्रमांक 38 चे नगरसेवक आहेत. प्रफुल्ल गुडधे हे स्वतःला जनतेसाठी समर्पित असल्याचे सांगत असून त्यांची प्रतिमा अतिशय सक्रिय नगरसेवक अशी आहे. 2008 मध्ये निर्माण झालेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. 2019 च्या निवडणुकीत फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचा पराभव केला. त्यानंतर फडणवीस 49,344 मतांनी विजयी झाले. यापूर्वी 2014 मध्ये प्रफुल्ल गुडधे यांचा 58,942 मतांनी पराभव झाला होता.