निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी लाडक्या बहीण-भावांना पत्र; केले महत्वाचे आवाहन

    18-Nov-2024   
Total Views |
 
Devendra Fadnavis wrote letter to brothers and sisters
 
 
एबी न्यूज नेटवर्क :
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. महायुति (भाजपा-शिंदे शिवसेना गट- राष्ट्रवादी अजित पवार गट) असो की महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट-युबीटी शिवसेना गट), प्रत्येक पक्षाने शेवटच्या क्षणी प्रचारात पूर्ण ताकद झोकून दिली आहे. दोन्ही युतींचे सर्वाधिक लक्ष नागपूरवर आहे. ज्या अंतर्गत काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते सभा आणि रोड शो करून आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ मते मागताना दिसत आहेत.
 
आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभरात मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. अशातच निवडणुकीपूर्वी भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लाडक्या बहीण-भावांना पत्र लिहिले आहे. ही निवडणूक फक्त एका पक्षाला मतदान करण्यासाठी नसून समृद्ध व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. चला, एकत्र येऊया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची कवाडे उघडूया, असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.
 
 
 
फडणवीसांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे की, प्रिय लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. येत्या 20 नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे; त्यामुळे ते देण्यापूर्वी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचा, लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा, तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा, राज्यात उ‌द्योगांना चालना देण्याचा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा विस्तार यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार मनापासून नक्की करा.
 
ही निवडणूक फक्त एका पक्षाला मतदान करण्यासाठी नसून समृद्ध व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्या.
 
चला, एकत्र येऊया महायुतीमधील कमळ, धनुष्यबाण तसेच घड्याळ चिन्हांसमोरील बटन दाबून महाराष्ट्राच्या प्रगतीची कवाडे उघडूया. धन्यवाद!