कोलकाता : पश्चिम बंगालमधून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. हावडा येथे भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. येथील एका कारखान्याला आग लागल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हावडा येथील डोमजूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजापूर भागातील आहे. येथील थर्माकोल कारखान्यात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
West Bengal | Massive fire breaks out in a thermocol factory in the Rajapur area of Domjur police station in Howrah. 3 fire tenders have reached the spot
— ANI (@ANI) January 22, 2022
Details awaited pic.twitter.com/tId0JD9mwn
यापूर्वी बंगालची राजधानी कोलकाता येथील पार्क शो सिनेमागृहात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांद्वारे घटनास्थळाची परिस्थिती हाताळण्यात आली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली होती.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.