Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
उमेदवारी न मिळाल्याने गोव्याचे माजी मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय, उत्पल पर्रीकरांपाठोपाठ तेही... ? 
22-Jan-2022, 5:04:24 pm
Edited by - Pravin Wankhede
गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत Goa Assembly Elections) स्वर्गीय मनोहर पर्रीकरांच्या (Manohar Parrikar) चिरंजीवांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पंजीतून त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारली असल्याने उत्पल यांनी हा निर्णय घेतला. परंतु हा विषय येथेच थांबत नाही तर उत्पल पर्रीकरांपाठोपाठ आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे एक ज्येष्ठ नेते पक्षाची साथ सोडू शकतात.
Abhijeet Bharat

पणजी : गोव्याच्या विधानसभेची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना उत्पल पर्रीकरांनी भाजपाची साथ सोडली आहे. स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदार संघातून भाजपाने त्यांना उमेदवारी द्यावी, अशी उत्पल पर्रीकरांची इच्छा होती. परंतु, असे झाले नाही. अखेर उत्पल पर्रीकर यांनी याच पणजी मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे हा निर्णय घेतेवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही उत्पल यांना आम आदमी पार्टीचे नेतृत्व करण्याचे निमंत्रण दिले होते.

आपल्या वडिलांच्या अर्थात स्वर्गीय मनोहर पर्रीकरांच्याच मतदार संघातून उमेदवारी मिळावी, हा प्रयत्न करणाऱ्या उत्पल यांनी गेल्या वर्षभरापासून मोर्चाबांधणी केल्याचे देखील बोलल्या जाते. तिकडे दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही राम-राम करण्याची घोषणा केली आहे. त्यांना मांद्रेम मतदार संघातून उमेदवारी हवी होती. परंतु, भाजपाने तेथे आमदार दयानंद सोपते यांना उमेदवारी दिली. लक्ष्मीकांत पार्सेकर आज संध्याकाळी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून, अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. 

हेही वाचा : गोव्यात भाजपाच्या यादीत पर्रीकरांचे नाव नाही, काय असेल भाजपाची रणनीती ?

६५ वर्षीय पार्सेकर मांद्रेम मतदार संघातून २००२ ते २०१७ असे १५ वर्ष आमदार राहिले आहेत. ते २०१४ ते २०१७ गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्य सांभाळले असून, स्वर्गीय मनोहर पर्रीकर केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर मुख्यमंत्री पद लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे आले. २०१७ साली दयानंद सोपते यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव केला. त्यानंतर सोपते यांनी ९ सहकाऱ्यांसमवेत भाजपात प्रवेश घेतला. 

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.