Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृती विषयीचे लेटेस्ट अपडेट्स
22-Jan-2022, 4:06:29 pm
Edited by - Pravin Wankhede
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर सध्या दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. त्यांना न्यूमोनियाची (Pneumonia) लागण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आता त्यांच्या प्रकृती विषयीची एक चांगली बातमी डॉक्टरांनी दिली आहे.
Abhijeet Bharat

मुंबई : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील बीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांचे वय पाहता त्यांच्यवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. शिवाय, त्यांना प्राणवायूचा आधारही देण्यात आला होता.  

गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांचे शरीर उपचारांना प्रभावी साथ देत नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातील त्यांचे चाहते प्रार्थना करीत होते. सोमवारी अर्थात १७ जानेवारीला त्यांच्या निवासस्थानी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. लता मंगेशकर यांची धाकटी बहीण आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले होते की, 'लता दीदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी कुटुंबातील सदस्य घरीच भगवान शिवाची पूजा करत आहेत.  

आज ब्रीच कॅण्डी रुग्णालयाने लतादीदींच्या प्रकृतीची माहिती देणारे अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात डॉ. प्रतीत सामदानी यांनी लतादीदींच्या तब्येतीत किंचित सुधारणा झाली असल्याचे सांगितले आहे. त्यांचे शरीर उपचाराला साथ देत असून, ९२ वर्षांचे वय बघता त्यांना अतिदक्षता विभागातच ठेवण्यात येणार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

वाचा : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर अद्यापही आयसीयूमध्येच; त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी घरी पूजा सुरु

दरम्यान, याविषयी बोलताना राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. जालन्यात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते की, 'लताजींच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे. मी ब्रीच कँडी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी बोललो असून, त्यांनी मला त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. मी त्यांना सांगितले की रुग्णालयातील प्रवक्त्यांनी गायिका लताजींच्या प्रकृतीबद्दल अपडेट द्यावे. कारण लोक त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.

वाचा : मोठी बातमी! गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; आयसीयूमध्ये दाखल

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.