Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय! इंडिया गेटवर बसवला जाणार नेताजींचा भव्य पुतळा
21-Jan-2022, 6:28:27 pm
Edited by - Smruti Chobitkar
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. इंडिया गेटवर (Indian Gate) नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांचा भव्य पुतळा (Huge Statue) बसवण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. (pm narendra modi announces huge statue of netaji subhash chandra bose will install at india gate)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीनीकरण करण्याच्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. पंतप्रधानांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'जेव्हा संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे, त्यावेळी मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, इंडिया गेटवर नेताजींचा ग्रेनाईटचा भव्य पुतळा बसवला जाणार आहे. हे भारताच्या त्यांच्या ऋणानुबंधाचे प्रतीक असेल.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जोपर्यंत नेताजींच्या भव्य पुतळ्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी असेल. नेताजींच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करेल, असे मोदींनी सांगितले.

अमर जवान ज्योतीबाबत इंडिया गेटवर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे. वास्तविक, केंद्र सरकारने अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.   

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.