Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
शिमला येथील घराला भीषण आग; मदत आणि बचावकार्य सुरू
21-Jan-2022, 4:59:18 pm
Edited by - Smruti Chobitkar
हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमला जिल्ह्यात (Shimla District) शुक्रवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. शिमला जिल्ह्यातील चिरगाव रोगडू (Chirgaon Rohru) गावात एका घराला भीषण आग लागली. या घटनेमुळे जवळपासच्या परिसरात खळबळ उडाली. (himachal pradesh fire broke out at house in chirgaon rohru area of shimla)
Abhijeet Bharat

शिमला : देशात दररोज वेगवेगळ्या राज्यांमधून काही घटना घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. शुक्रवारी हिमाचल प्रदेशातील एका घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात शुक्रवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. शिमला जिल्ह्यातील चिरगाव रोगडू गावात एका घराला भीषण आग लागली. या घटनेमुळे जवळपासच्या परिसरात खळबळ उडाली. घराला लागलेल्या आगीमुळे नेमके किती नुकसान झाले आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. घटनास्थळी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये घराला लागलेली आग भीषण स्वरूपाची असल्याचे दिसत आहे. आगीचे लोळ घराच्या छताच्या वरपर्यंत उठताना दिसत आहे. 


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.