Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
आनंद महिंद्रांनी पाळला शब्द! सुवर्णपदक जिंकणाऱ्या अवनी लेखराला दिली विशेष भेट
20-Jan-2022, 6:43:40 pm
Edited by - Smruti Chobitkar
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी गेल्यावर्षी टोकियो पॅरालिम्पिकमधील (Tokyo Paralympic) सुवर्णपदक विजेत्या अवनी लेखरा (Gold Medalist Avani Lekhara) हिला खास कस्टम-मेड XUV700 Gold Editon कार भेट दिली आहे. (anand mahindra gave custom made xuv700 paralympic gold medalist avani lekhara)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अनेकवेळा भारतासाठी विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या महिंद्रा कार भेट दिल्या आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूला विशेष पद्धतीने बनवण्यात आलेली कार भेट म्हणून दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी गेल्यावर्षी टोकियो पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या अवनी लेखरा हिला खास कस्टम-मेड XUV700 Gold Editon कार भेट दिली आहे.

या एक्सक्लुसिव्ह XUV700 मध्ये समोरच्या दोन्ही सीट्स कस्टम मेड आहेत. दिव्यांग व्यक्ती या कारमध्ये सहज चढू आणि उतरू शकतात. ऑगस्ट 2021 मध्ये महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अवनी लेखरा हिला खास SUV देण्याचे वचन दिले होते, जे त्यांनी आता पूर्ण केले आहे. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर स्टँडिंग SH1 मध्ये सुवर्णपदक पटकावले. नेमबाजी पॅरा स्पोर्ट्समधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. या सुवर्णपदकासह अवनीने 249.6 मीटरचा नवा पॅरालिम्पिक विक्रमही नोंदवला आहे.

कारमध्ये खास कस्टम मेड सीट
अवणीला भेट म्हणून मिळालेल्या या विशिष्ट महिंद्रा XUV700 कारच्या पुढच्या सीट्स मागे-पुढे करताच बाहेर येतात. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला यात बसणे सोपे जाते. सीटवर बसल्यानंतर रिमोटच्या साहाय्याने सीट गाडीच्या आत घेता येते. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना मोठ्या वाहनांमध्ये जास्त उंचीवर बसणे अवघड जाते, त्यामुळे या कारमध्ये या विशेष सीट्स बसवण्यात आल्या आहेत.

यापूर्वीही खेळाडूंना देण्यात आलीये गोल्ड एडिशन
आनंद महिंद्रा यांनी यापूर्वीही XUV700 ची गोल्ड एडिशन नीरज चोप्रा आणि सुमित अँटिल यांना दिली आहे. महिंद्राच्या डिझाईन ऑफिसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य डिझाइन अधिकारी प्रताप बोस यांनी तिन्ही गाड्यांचे डिझाइन केले आहे. अवनीची XUV मिडनाईट ब्लॅक शेडमध्ये आहे.

XUV700 ची किंमत 12.95 लाख रुपयांपासून सुरू
Mahindra XUV700 ही कंपनीची सर्वात महागडी SUV कार आहे आणि भारतात तिची एक्स-शोरूम किंमत 12.95 लाख रुपयांपासून सुरू होऊन सर्वाधिक 23.79 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने या एसयूव्हीला मजबूत सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.