हिस्सार : हरियाणातील हिस्सार येथे असलेल्या केंद्रीय अश्व अनुसंधान संस्थेतील (Central Horse Research Institute) वैज्ञानिकांनी प्राण्यांना देण्यात येणारी कोरोना लस बनवली आहे. या लसीची सेनेतील २३ श्वानांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. लस दिल्यावर २१ दिवसांनी कुत्र्यांच्या शरीरात कोरोना विरुद्धच्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. यानंतर गुजरातच्या जुनागढ सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील १५ सिंहाना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी गुजरात सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रयोग यशस्वी झाली तर ही लस बाजारात आणली जाणार असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
हिस्सार येथील केंद्रीय अश्व अनुसंधान संस्थेतील वैज्ञानिक डॉ. नवीनकुमार यांनी सांगितले की, सार्स कोरोना कोविड-१९ हा विषाणू कुत्री, मांजरे, चित्ता, सिंह, तरस, हरणे या प्राण्यांमध्ये जगभर प्रामुख्याने सापडला आहे. चेन्नईच्या प्राणीसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू याच विषाणूमुळे झाला आहे. माणसानासुद्धा डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग मोठा होता. यामुळे डेल्टा संसर्ग झालेल्या माणसाच्या शरीरातील विषाणू प्रयोगशाळेत आयसोलेट करून, त्यापासून ही लस बनविली गेली आहे.
या संस्थेत झालेल्या संशोधनात हा विषाणू माणसांकडून प्राण्यात आणि प्राण्यांकडून माणसात संक्रमित होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशी लस तयार करणे गरजेचे होते असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. खरं तर अमेरिका, रशियाने यापूर्वीच प्राण्यांना कोरोना लस देणे सुरु केले आहे. आता भारतात सुद्धा प्राण्यांचे कोरोना लसीकरण सुरु केले जाणार असून केंद्र सरकार त्याबाबत गंभीर विचार करत आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.