Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
गोव्यात भाजपाच्या यादीत पर्रीकरांचे नाव नाही, काय असेल भाजपाची रणनीती?
20-Jan-2022, 2:40:29 pm
Edited by - Smruti Chobitkar
गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या तयारीला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही विशेष रणनीती तयार केली असून, भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. महत्वाचे म्हणजे त्यात स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला...
Abhijeet Bharat

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सांकेलीम मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर हे मडगावमधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना मात्र यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चाना ऊत आला आहे.

गोव्यात बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. परंतु, भाजपा कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. महत्वाचे म्हणजे गोव्यात भाजपा आणि उत्पल पर्रीकर यांचातील मुद्दा फार चर्चेचा विषय ठरतो आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उत्पल पर्रीकरांना झुकते माप देणार का याकडे सगळ्यांचे लक्ष होते. आज जाहीर झालेल्या यादीत ४० पैकी ३४ जागांवारांचे नाव जाहीर झाले आहेत.

उत्पल पर्रीकरांना ज्या-ज्या पणजी मतदार संघातून निवडणूक लढायची होती, तिथून भाजपाने विद्यमान आमदार अतानासिओ मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. महत्वाचे म्हणजे उत्पल पर्रीकरांविषयी विचारले असता, मनोहर पर्रीकरांचे कुटुंब आमचेच कुटुंब असून, उत्पल पर्रीकर यांना दुसऱ्या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पुढे फडणवीस म्हणाले, आम्ही उत्पल पर्रीकर यांना पणजी वगळता दोन जागांचा पर्याय दिला होता. त्यांनी जागा नाकारली होती. ते आम्ही सुचवलेल्या जागेवरून निवडणूक लढवण्यास तयार होतील, अशी आम्हाला आशा आहे. विधानसभेच्या एकूण ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार असून १० मार्चला मतमोजणी आहे.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

      

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.