Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनो कोरोना लस घेताय? मग आधी ही बातमी वाचा
19-Jan-2022, 5:44:30 pm
Edited by - Smruti Chobitkar
५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोरोना लस 'कोवॅक्सिन'ला (Covaxin) मंजुरी मिळाली आहे. मात्र, मुलांना कोवॅक्सिन व्यतिरिक्त इतर लसींचा डोस... (bharat biotech receiving reports 15 18 age group being administered unapproved covi19 vaccines)
Abhijeet Bharat

हैदराबाद : देशात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तुम्ही देखील तुमच्या १५ ते १८ वर्षांच्या मुलाला कोरोना लसीचा डोस देणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोरोना लस 'कोवॅक्सिन'ला (Covaxin) मंजुरी मिळाली आहे. मात्र, मुलांना कोवॅक्सिन व्यतिरिक्त इतर लसींचा डोस दिला जात असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत, असे विधान भारत बायोटेकने केले आहे.

भारत बायोटेकने मंगळवारी सांगितले की, १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन व्यतिरिक्त इतर मान्यता नसलेल्या कोरोना लसीचे डोस दिले जात असल्याचे अनेक अहवाल प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर, भारत बायोटेकने आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आणि या विशिष्ट वयोगटातील मुलांना  केवळ कोवॅक्सिन लस दिली जाईल याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

भारत बायोटेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस एकमेव मंजूर झालेली कोरोना लस आहे, जी १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाते. मात्र, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना मंजूर नसलेल्या कोरोना लसींचे डोस दिल्याचे अनेक अतिरिक्त अहवाल आम्हाला प्राप्त झाले आहेत, असे कंपनीने सांगितले.

याशिवाय, एका निवेदनात कंपनीने नमूद केले आहे की, लसीकरणानंतरच्या सर्व प्रतिकूल घटनांची नोंद आरोग्य मंत्रालय आणि AEFI (पोस्ट-इम्यून प्रतिकूल घटना) केंद्रांना केली जाते. भारत बायोटेककडे AEFIs मिळवण्यासाठी आणि त्याची चाचणी करण्यासाठी व्यापक फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम देखील आहेत.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.