लखनऊ : भारतीय जनता पक्षातून (भाजपा) अनेक मागासवर्गीय नेत्यांना फोडून ताकद वाढवण्याचा संदेश देणाऱ्या समाजवादी पक्षाचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना बुधवारी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षाने मोठा झटका दिला. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी सपाचे तीन वेळा आमदार राहिलेले आणि फिरोजाबाद जिल्ह्यातील नेते हरीओम यादव यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता.
Delhi | Aparna Yadav, former Uttar Pradesh Chief Minister Mulayam Singh Yadav's daughter-in-law joined BJP today in the presence of deputy CM Keshav Prasad Maurya & BJP State president Swatantra Dev Singh pic.twitter.com/gKjIhF4VD2
— ANI (@ANI) January 19, 2022
समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात उत्तर प्रदेश भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, अपर्णा यादव या मुलायम सिंह यांची सून असूनही त्यांनी आपले मत मांडले आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव म्हणाल्या की, मी भाजपाची खूप आभारी आहे. माझ्यासाठी देश नेहमीच प्रथम येतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक करते.
I have always been very vocal about the policies & ideologies of PM Modi & BJP. Nationalism is a very important aspect of my life. I've always thought of nation before anything. Whatever they'll say, I do it (will you contest from Lucknow Cantt seat): BJP leader Aparna Yadav pic.twitter.com/2FGqCyEWuT
— ANI (@ANI) January 19, 2022
पुढे त्या म्हणाल्या, मी नेहमीच पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या धोरणांबद्दल आणि विचारसरणीबद्दल खूप बोलली आहे. राष्ट्रवाद हा माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. मी नेहमी कोणत्याही गोष्टीपूर्वी राष्ट्राचा विचार केला आहे. लखनऊ कॅन्टच्या जागेवरून निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता मला संधी मिळाल्यास मी लढेल, असे अपर्णा यादव म्हणाल्या.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.