Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
कोरोना वाढतोय, जपा स्वतःला! रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळशीचा काढा गुणकारी
18-Jan-2022, 3:46:06 pm
Edited by - Smruti Chobitkar
Tulsi Kadha Recipe : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि ओमिक्रॉनच्या (Omicron) सतर्कतेदरम्यान रोगप्रतिकार शक्ती (Immune System) अधिक मजबूत करण्यासाठी तुळशीचा काढा खूप फायदेशीर आहे. पौराणिक महत्त्वाव्यतिरिक्त तुळशीमध्ये (Tulsi) औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो.
Abhijeet Bharat

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व्यक्तीच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन काळापासून तुळशीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्याच्या सेवनाने बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. तुळशीचा काढा केवळ सर्दी आणि खोकलाच दूर करत नाही, तर व्यक्तीच्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो. चला तर मग जाणून घेऊया तुळशीचा काढा बनवण्याची सोपी पद्धत...

तुळशीचा काढा बनवण्याचे साहित्य:
१. १०-१२ तुळशीची पाने
२. अर्धे लेमनग्रास (हिरव्या चहाचे पान)
३. १ इंच किसलेले आल
४. ४ कप पाणी
५. गूळ 3 चमचे

कृती :
१. सर्व प्रथम तुळशीची पाने आणि लेमनग्रास चांगले धुवून घ्या.
२. एका पातेल्यात पाणी घालून मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा.
३. पाणी थोडे गरम झाल्यावर त्यात तुळशीची पाने, लेमनग्रास आणि किसलेल आलं घालून ४-५ मिनिटे उकळा.
४. यानंतर त्यात गूळ टाकून गॅस बंद करा.
५. चमच्याने काढा ढवळत राहा, जेणेकरून गूळ विरघळेल.
६. १-२ मिनिटांनंतर एका कपमध्ये गाळून घ्या आणि चहासारखे थोडे-थोडे प्या.
७. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुळशीच्या काढ्यामध्ये २-३ काळी मिरी देखील टाकू शकता.
८. तसेच अधिक चव हवी असल्यास एक वेलची ठेचून घाला.
९. लेमनग्रास मिळाला नसल्यास हरकत नाही. त्याशिवाय देखील तुम्ही तुळशीचा काढा बनवू शकता.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.