Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
भाषणादरम्यान Teleprompter बंद झाल्याने असे अ ड ख ळ ले पंतप्रधान मोदी!
18-Jan-2022, 1:47:20 pm
Edited by - Pravin Wankhede
एक प्रखर वक्ते म्हणून जगात नाव लौकिक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका भाषण दरम्यान गोंधळ उडाला. तसे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि हजरजवाबीपणामुळे तासंतास सलग भाषण देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तृत्व कौशल्याचे दाखले दिले जातात. पण अचानक
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: एक प्रखर वक्ते म्हणून जगात नाव लौकिक असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका भाषण दरम्यान गोंधळ उडाला. तसे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या चाणाक्ष बुद्धीने आणि हजरजवाबीपणामुळे तासंतास सलग भाषण देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तृत्व कौशल्याचे दाखले दिले जातात. असं असताना अचानक त्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ उडाला, या गोंधळच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देत असताना समोर असलेल्या Teleprompter मध्ये बिघाड झाल्याने अडखळण्याचे दिसून येत आहे.

हे वाचा- मोठी दुर्घटना टळली! वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्सप्रेस उतरली रुळावरून

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दृकश्राव्य माध्यमांतून भाषण देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Teleprompter अचानक बिघडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग बोलता बोलता अचानक थांबले. काय बोलायचं ते त्यांना सुचेनासे झाले. त्यामुळे ते स्क्रिनच्या उजवीकडेही डावीकडे पाहू लागले. अडखळलेल्या अवस्थेत असलेल्या मोदींनी कानात हेडफोन लावून आपलं भाषण ऐकू येतं आहे का? हे विचारून वेळ सावरून नेण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगलेच गोंधळलेले दिसले. हेच सगळं असलेला साधारण मिनिटभराचा व्हीडिओ ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतकं खोटं Teleprompter ही बोलू शकला नाही- राहुल गांधी

Teleprompter बिघाड प्रकरणी राहुल गांधी  ट्विट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या क्लिपची खिल्ली उडवली आहे. 'इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या विरोधात ट्विट केलं आहे.

हे वाचा- Modi Temple: थेट दिल्लीहून आला फोने अन ते मंदिर.....

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.