पणजी : कोलकातानंतर पुन्हा एक मोठा रेल्वे अपघात टळला आहे. वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्सप्रेस मंगळवारी सकाळी रुळावरून उतरल्याची घटना घडली आहे. गोव्यातील दूधसागर ते कॅरनझोल दरम्यान ट्रेनच्या मुख्य भागाची पुढची चाके रुळावरून घसरल्याने ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
The full rake of the train is unaffected and is being backed towards Dudhsagar by ART (Accident Relief Train). Senior officers are monitoring the situation closely.
— ANI (@ANI) January 18, 2022
वास्को-द-गामा हावडा अमरावती एक्सप्रेस मंगळवारी सकाळी ८:५६ वाजता रुळावरून उतरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनच्या संपूर्ण रेकवर कोणताही परिणाम झाला नाही आणि एआरटी (अपघात निवारण ट्रेन) द्वारे दूधसागरच्या दिशेने नेण्यात येत आहे. सर्व वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. निश्चितच ही एक मोठी घटना आहे. परंतु, या घटनेत कोणतीही हानी झाली नसल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.