Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
पंजाबमध्ये मुख्यमंत्री चन्नी यांच्या निकटवर्तीयांसह १० ठिकाणी ईडीचे छापे
18-Jan-2022, 1:45:36 pm
Edited by - Smruti Chobitkar
Illegal Sand Mining Case : अंमलबजावणी संचालनालयाने (Eenforcement Directorate) पंजाबमधील (Punjab) १० ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध वाळू उत्खनन (Illegal Sand Mining Case) आणि पैशांचा अवैध व्यवहार प्रकरणी हा छापा (Raid) टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (enforcement directorate conducting raids in punjab in illegal sand mining case)
Abhijeet Bharat

अमृतसर : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पंजाबमधील १० ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध वाळू उत्खनन आणि पैशांचा अवैध व्यवहार प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने छापे टाकलेल्या ठिकाणांमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे नातेवाईक भूपिंदर सिंग हनी यांच्या मोहाली येथील निवासस्थानाचाही समावेश आहे.

यापूर्वी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्या जवळच्या लोकांवर वाळू उत्खननाच्या अवैध व्यवहारात सहभाग असल्याचा आरोप केला आहे. अवैध वाळू उत्खननाच्या संदर्भात ईडीने मोहालीसह पंजाबमधील वेगवेगळ्या १० ते १२ ठिकाणी छापे टाकले आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाने मोहालीच्या होमलँड सोसायटीवरही छापा टाकला असून येथे मुख्यमंत्री चन्नी यांच्या मेहुण्याचे घर आहे. वाळू उत्खननाचे कंत्राट मिळवण्यासाठी भूपिंदर यांनी पंजाब रियल्टर्स नावाची फर्म स्थापन केल्याचा आरोप आहे. वाळू खाणीचे कंत्राट घेण्यासाठी काळ्या पैशाचा वापर झाल्याचा ईडीला संशय आहे. राज्यात विधानसभा निवडणुका होत असताना ईडीने ही छापेमारी केली आहे.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, त्यांच्या नातेवाईकाच्या ठिकाणावर छापा टाकला जात आहे. ते मला टार्गेट करत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. आम्ही यासाठी लढण्यास तयार आहोत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही असेच घडले होते, असे ते म्हणाले.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.