नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मुख्य निवडणूक आयुक्त्त सुनील चंद्र यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात सात टप्यात निवडणूक होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पंजाब विधानसभासाठी दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र, आता निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हे वाचा- ठरलं! UP, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान निवडणूक
Punjab Assembly election will be held on 20th February: ECI pic.twitter.com/rPJTAt0OEn
— ANI (@ANI) January 17, 2022
केंद्रीय निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख पुढे ढकलली असून, आता पंजाब मध्ये मतदान २० फेब्रुवारीला पारपडेल.
मिळालेल्या माहितीनुसार, संत रविदास यांची जयंती असल्यामुळे मतदान पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगितल्या जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी संत रामदास यांची जयंती असल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली असली तरी मतमोजणी १० मार्च रोजीच होणार आहे.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.