Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
कोरोनात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट; ओमिक्रॉन संक्रमितांची संख्याही ८ हजारांवर
17-Jan-2022, 4:07:35 pm
Edited by - Smruti Chobitkar
देशात सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या लाटेत २४ तासात कोरोना रुग्णांमध्ये एवढी घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २ लाख ५८ हजार ०८९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. (slight decrease in daily covid 19 cases in last 24 hrs in india)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासात भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत १३ हजार ११३ ची घट दिसून आली आहे. देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २ लाख ५८ हजार ०८९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी देशात २ लाख ७१ हजार २०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. देशात सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या लाटेत २४ तासात कोरोना रुग्णांमध्ये एवढी घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासात १ लाख ५१ हजार ७४० कोरोना रुग्ण बरे झाले असून ३८५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ५६ हजार ३४१ झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांबद्दल सांगायचे झाले तर हा आकडा ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ वर पोहोचला आहे. तर देशभरात आतापर्यंत एकूण  ४ लाख ८६ हजार ४५१ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ
दुसरीकडे, देशभरात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील ओमिक्रॉनची एकूण प्रकरणे ८,२०९ वर पोहोचली आहे. रविवारपर्यंत ही संख्या एकूण ७,७४३ इतकी होती.

एकूण लसीकरणाच्या डोसची संख्या १५७ कोटींच्या वर
देशात गेल्या २४ तासात कोरोना लसीचे ३९ लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत एकूण १५७ कोटी २० लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी कोरोना विषाणूविरूद्धच्या लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

   

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.