Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन
17-Jan-2022, 12:01:13 pm
Edited by - Pravin Wankhede
कथ्थक नृत्याला जागतिक पातळीवर एक आगळीवेगळी ओळख मिळवून देणारे जगविख्यात कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले. वयाच्य  83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 
Abhijeet Bharat

मुंबई : कथ्थक नृत्याला जागतिक पातळीवर एक आगळीवेगळी ओळख मिळवून देणारे जगविख्यात कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले. वयाच्य  83 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

हे वाचा- 'पेंचची राणी' 'सुपर मॉम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कॉलरवाली वाघीण’चा मृत्यू

पद्मविभूषण बिरजू महाराज यांनी रविवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.अशी माहिती रागिणी महाराज यांनी वृत्तसंस्थेला दिली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते. रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यानंतर त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. असे रागिणी महाराज यांनी सांगितले.

बिरजू महाराज यांना 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. 2012 मध्ये, त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 मध्ये, बाजीराव मस्तानीच्या ‘मोहे रंग दो लाल’साठी त्यांना नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

हे वाचा-  लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती काय? जाणून घ्या

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.