भोपाळ: मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच राष्ट्रीय उद्यानातील २९ बछड्यांना जन्म देणारी ‘सुपर मॉम’ अशी विशेषणाने ओळखल्या जाणारी ‘कॉलरवाली वाघीण’ चा मृत्यू झाला आहे.
१७वर्षीय कॉलरवाली वाघिणीने १२ वर्षांची असताना २६ बछड्यांना जन्म दिला होता त्यामुळे या वाघिणीला सुपर मॉम म्हणून संबोधल्या जाऊ लागले होते. तसेच तिला ‘पेंचची राणी’ असे म्हणूनही पर्यटक ओळखतात.
T-१५ अर्थात कॉलरवाली असे अनोखे नाव असणाऱ्या वाघिणीचा जन्म सप्टेंबर २००५ मध्ये झाला आणि तिने २००८ पहिल्यांदा शवकाला जन्म दिला. तेव्हा पासून आजवर तिने आठ प्रसूतींमध्ये २९ शावकांना जन्म दिला. गेल्या काही दिवसांपासून ही वाघीण आजारी होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना तिच्याकडून मिळणारा प्रतिसाद कमी होत गेला आणि तिचा अखेर मृत्यू झाला. पेंच राष्ट्रीय उद्यानातील सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम तिच्या नावे आहे.
वाघिणीच्या मृत्यूवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विट करीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मप्र को टाइगर स्टेट का दर्जा दिलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाली, मध्यप्रदेश की शान व 29 शावकों की माता @PenchMP की ‘सुपर टाइग्रेस मॉम’ कॉलरवाली बाघिन को श्रद्धांजलि।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) January 16, 2022
पेंच टाइगर रिजर्व की 'रानी' के शावकों की दहाड़ से मध्यप्रदेश के जंगल सदैव गुंजायमान रहेंगे। pic.twitter.com/nbeixTnnWv
अशी मिळाली ओळख
डेहराडूनच्या काही तज्ज्ञांनी २००८ साली या वाघिणीला बेशुद्ध करून तिच्या शरीरात रेडिओ कॉलर ट्रान्सप्लँट केला होता. त्यावरूनच तिचं नाव कॉलरवाली वाघीण असे पडले होते. या वाघिणीचा बाप असलेल्या वाघाला चार्जर या नावाने ओळखले जात असे.
सौजन्य- छायाचित्र वरून ठक्कर( सोशल मीडियाहुन)
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.