Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
देशात लसीकरणाला वर्षपूर्ती आजवर १५६ कोटी ७६ लाख नागरिकांचे झाले लसीकरण
16-Jan-2022, 5:18:44 pm
Edited by - Pravin Wankhede
कोरोना महामारीवर प्रहार करण्यासाठी देशात १६ जानेवारी २०२० पासून जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली होती, आज या मोहिमेला वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिवादन केले आहे.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: कोरोना महामारीवर प्रहार करण्यासाठी देशात १६ जानेवारी २०२० पासून जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली होती, आज या मोहिमेला वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिवादन केले आहे. लसीकरण मोहिमेत  डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी बजावलेल्या भूमिकेचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे, असेही ते म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करीत म्हणले की, लसीकरण मोहिमेला एक वर्ष झाले. लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी अभिवादन  करतो. आपल्या  लसीकरण कार्यक्रमाने कोविड-19 विरुद्धच्‍या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे. यामुळे जीव वाचले आहेत आणि उपजीविका राखल्या गेल्या. यात  आपले डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांची भूमिका अनन्यसाधारण  आहे. जेव्हा आपण दुर्गम भागात लसीकरण करत असलेल्या लोकांची किंवा आपले आरोग्य कर्मचारी तेथे लस घेऊन जातात, ती  क्षणचित्रे  पाहतो तेव्हा आपले हृदय आणि मन अभिमानाने भरून येते.

महामारी विरुद्ध  लढण्याचा भारताचा दृष्टीकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील. आपल्या नागरिकांना योग्य देखभाल मिळावी यासाठी आम्ही आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहोत.  चला, आपण सर्व कोविड-19 संबंधित प्रोटोकॉलचे पालन करत राहू आणि महामारीवर मात करू असे म्हंटले आहे.

गेल्या २४ तासांच्या कालावधीत कोरोना प्रतिबंधक लसीच्या ६६ लाखांहून अधिक  (66,21,395) मात्रा देण्यात आल्या आहे. भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने १५६ कोटी ७६ लाखांचा (1,56,76,15,454) टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत १,३८,३३१ रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता ३,५०,८५,७२१ झाली आहे.परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता  ९४.५१ टक्के झाला आहे.

गेल्या २४ तासांत, देशात  2,71,202  नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या  15,50,377  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या  4.18 टक्के आहे. कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,65,404 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर  70 कोटी  24 लाखांहून अधिक (70,24,48,838 ) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.