नागपूर : घसा खराब झाला किंवा खोकला येत असेल तर ज्येष्ठमध चघळण्यास किंवा त्याचे चूर्ण मधासोबत घेण्यास सांगितले जाते. पण ज्येष्ठमधाचे अजून अनेक फायदे आहेत. चवीला गोड लागणारे ज्येष्ठमध कॅल्शियम, ग्लीसारायजक अॅसिड, अँटी ऑक्सिडंटस्, अँटी बायोटिक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये प्रथिनेही आहेत. ज्येष्ठमधाच्या वापराने डोळ्यांशी निगडीत विकार, तोंड येणे, घसा खराब असणे, दम लागणे, हृदयरोग, तसेच जुन्या जखमांच्या उपचारामध्ये अतिशय चांगला गुण येतो.
या विकारांच्या उपचारांमध्ये ज्येष्ठमधाचा वापर गेली अनेक शतके केला जात आहे. ज्येष्ठ मध हे वात, कफ, पित्त दोषांना शमवून अनेक रोगांमध्ये रामबाण इलाज म्हणून सिद्ध झालेले आहे. ज्येष्ठमधाच्या काढ्याने डोळे धुतले असता, डोळ्यांशी निगडीत विकार दूर होण्यास मदत होते. ज्येष्ठमधाची पूड आणि बडीशेपेची पूड समप्रमाणात घेऊन ती एकत्र करावी. हे मिश्रण दररोज संध्याकाळी एक लहान चमचा घेतल्याने दृष्टीदोष नाहीसे होऊन डोळ्यांची जळजळ थांबते. जर डोळे काही कारणाने सतत लाल होत असतील. तर ज्येष्ठमध पाण्यामध्ये उगाळून घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा भिजवावा, हा बोळा डोळ्यांवर बांधला असता, डोळ्यांची लाली कमी होते.
रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाणे आरोग्यासाठी उत्तम; मिळतील ५ मोठे फायदे
अनेकदा उष्णतेमुळे तोंड येते. तोंडामध्ये लहान लहान फोड येतात, आणि त्यामुळे काहीही खाता-पिताना खूप त्रास होतो. अश्या वेळी ज्येष्ठमधाच्या लहान तुकड्याला मध लावून हा तुकडा चघळावा. ह्यामुळे तोंडातील फोड निवळतीलच, त्याशिवाय खोकला येत असल्यास किंवा घसा खराब असल्यास त्यातही आराम मिळेल. जर कोरडा खोकला येत असेल, तर ज्येष्ठमध पाण्यामध्ये उगाळून एक चमचा होईल इतपत चाटण तयार करावे. त्यामध्ये थोडे मध घालून हे चाटण दिवसातून तीन वेळा चाटवावे. ज्येष्ठमध पाण्यामध्ये उकळून तयार केलेला काढा, दररोज संध्याकाळी २० ते २५ मिलीलीटर इतक्या प्रमाणात घेतल्याने श्वास नलिका साफ होते. तसेच सतत उचकी लागत असल्यास ज्येष्ठमध चघळल्याने उचकी थांबते.
video/भाऊ नागपुरात चाललंय तरी काय, कधी दिसतो बिबट तर कधी मगर
त्वचारोगातही ज्येष्ठमध लाभकारी आहे. त्वचेवर मुरुमे, पुटकुळ्या येत असल्यास त्यावर ज्येष्ठमध उगाळून घेऊन त्याचा लेप लावल्याने मुरुमे लवकर निघण जातात, व त्यामुळे कोणतेही इन्फेक्शन होत नाही. तसेच जुने घाव असतील, तर त्यावर ज्येष्ठमध आणि तीळ एकत्र वाटून घेऊन त्यामध्ये तूप मिसळावे आणि घावावर लेप करावा. त्यामुळे जखमा लवकर भरून येतात.
अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.