Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
'Omicron'चे संकट थोपविण्यासाठी नागपूर NMC सज्ज केलेत हे उपाय
05-Dec-2021, 9:30:23 am
Edited by - Pravin Wankhede
कोरोनाच्या ‘ओमिक्रोन' या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आरोग्य सुविधा बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे आरोग्यविषय सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.
Abhijeet Bharat

नागपूर: कोरोनाच्या ‘ओमिक्रोन' या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आरोग्य सुविधा बळकट करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाच्या संभाव्य धोक्यामध्ये प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे आरोग्यविषय सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या श्री जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपाचे अत्याधुनिक १९९ बेड्सचे कोव्हिड हॉस्पीटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पीटल संभाव्य धोक्यामध्ये उपचारासाठी सज्ज झाले आहे. मनपाच्या या कोव्हिड हॉस्पीटलची महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाहणी केली. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजय दुधे, मनपाचे उपायुक्त मिलींद मेश्राम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ.शुभम मनगटे,. दहिकर आदी उपस्थित होते.

वाचा- Omicron Variantच्या भीतीने शहरात अचानक लसीकरणाला आला वेग

विद्यापीठातील कोव्हिड हॉस्पीटलमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालन करणाऱ्या आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थानतर्फे सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येईल. औषधालय (फार्मसी), पेंट्री आदी व्यवस्था सुद्धा या कोव्हिड हॉस्पीटलमध्ये असेल. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर हे हॉस्पीटल असून येथे लिफ्टची सोय आहे. हॉस्पीटलमध्ये एकूण १९९ बेड्स असून यामध्ये नवजात शिशू, १५ वर्षापर्यंतची मुले आणि इतर अन्य नागरिकांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचा- Omicron Variant : 'ओमिक्रॉन'ला RT-PCR चाचणीत ओळखणे शक्य; केंद्राने अशा केल्या सूचना

नवजात शिशूंसाठी २० बेड्स पीआयसीयू चे तर १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ३० बेड्स पीआयसीयू चे असतील. ५० बेड्सचे हे ऑक्सिजनचे व अन्य बेड्स सामान्य असतील. लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळी जागा, मुलांच्या पालकांसाठी प्रतीक्षागृह, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट व अन्य आवश्यक सुरक्षा साहित्यांच्या वापराकरिता स्वतंत्र कक्षाची व्यवस्था या हॉस्पीटलमध्ये करण्यात आलेली आहे. हॉस्पीटलमधील बेड्स हे अत्याधुनिक असून विजेव आधारित असल्याने रुग्णाची हालचाल करण्यास ते सोपे जाणार आहे. विद्यापीठ परिसरात हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. याशिवाय ९० ऑक्सिजन सिलींडरची स्वतंत्र व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे.

पहिल्या माळ्यावर रिशेप्शन काउंटरवर रुग्णाची नोंद झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. त्यानंतर रुग्णावर आवश्यक पुढील करण्यात येईल. विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या इमारतीच्या मागील बाजूने सुद्धा प्रवेश व बाहेर जाणे शक्य असल्याने या कोव्हिड हॉस्पीटलमुळे नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय कामामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ शकणार नाही.

वाचा-  Omicron Variant : सीरम इन्स्टिट्यूट नव्या व्हेरिएंटसाठी आणणार बूस्टर डोस


मनपाद्वारे निर्मित कोव्हिड हॉस्पीटलच्या पाहणी दरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. कोरोनाच्या संकटात शहरवासीयांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी विद्यापीठाने त्यांच्या इमारतीतील तील मजले देणे ही बाब राष्ट्रसंतांचा मानव सेवा या संदेशाचे पालन करण्याचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाची यापूर्वीची संभाव्य लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे पुढे येताच मनपाद्वारे विद्यापीठात कोव्हिड हॉस्पीटलची निर्मिती करण्याची संकल्पना पुढे आली. सर्व प्रक्रियेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी उत्तम सहकार्य केले. या हॉस्पीटलचे कार्य सुरूच होते. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या नवीन व्हेरियंटचा शिकराव होत असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता हॉस्पीटलचे काम त्वरीत पूर्ण करण्यात आले आहे.

वाचा-'डेल्टा'ची जागा घेणार 'ओमिक्रॉन'; जाणून घ्या काय म्हणाल्या WHOच्या शास्त्रज्ञ

हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालन करणाऱ्या आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थानद्वारे मनपाला मोठे सहकार्य मिळाले आहे. आज नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ४५० बेड्सची व्यवस्था उपलब्ध आहे. याशिवाय शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि एम्स येथेही रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मेयो, मेडिकल, एम्स व मनपाचे ४५० बेड्सची व्यवस्था अपुरी लागल्याच्या स्थितीमध्ये विद्यापीठातील कोव्हिड हॉस्पीटलमधील व्यवस्था खुली करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.

कोव्हिडचा संभाव्य धोका थोपविणे हे नागरिक म्हणून आपल्या हातात आहे. सुरक्षेच्या सर्व साहित्यांचा वापर आणि लसीकरणाचे दोन्ही डोज घेणे ही आपली जबाबदारी आपल्या शहराला संभाव्य धोक्यापासून दूर ठेवू शकणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने व जबाबदारीने सतर्क राहून या परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.