Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
World Soil Day 2021 : माती वाचवा, जीवन जगवा 
05-Dec-2021, 2:33:05 pm
Edited by - Smruti Chobitkar
जागतिक माती दिन साजरा व्हावा, अशी मागणी इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेसने (IUSS) २००२ साली केली होती. दरवर्षी ५ डिसेंबर रोजी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. (world soil day 2021 save soil save life)
Abhijeet Bharat

नागपूर : असे म्हणतात की 'मानवी शरीर मातीतून बनते आणि मातीतच मिसळते' हे वाक्य मार्मिक वाटत असले तरी सत्य आहे. मातीत उगवलेल्या अन्नधान्यातून पशू पक्ष्यांची आणि मानवाची उपजीविका चालते. त्याचमुळे मातीला मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक समजावा लागेल. परंतु, हाच मानव असंख्य चुका करत माती दूषित करतो. अर्थात जमिनीच्या नापिकीचे हेच प्रमुख कारण ठरते. दरवर्षी ५ डिसेंबर रोजी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. 

जागतिक माती दिन किंवा मृदा दिन साजरा व्हावा, अशी मागणी इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेसने (IUSS) २००२ साली केली होती. २०१९ साली झालेला जागतिक माती दिन 'जमिनीची धूप थांबवा, आमचे भविष्य वाचवा' या थीमवर साजरा झाला.

Abhijeet Bharat

जगासाठी गरजेचा असलेला अन्न-वस्त्र-निवारा मातीशिवाय अशक्य आहे. त्यामुळे मातीची गुणवत्ता जपणे गरजेचे आहे. मानव असंख्य चुका करतो. त्याचा फटका भूगर्भाच्या गुणवत्तेला बसतो. अर्थात जमिनीतील क्षार वाढत जातात.  

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये कापलेला कडबा-कुटार शेतातच जाळण्याची परंपरा आहे. असे केल्याने मातीची सुपीकता घटते. शिवाय वायूप्रदूषणही वाढते आहे. या प्रकारावर आळा घालण्याचा प्रयत्नही पर्यावरणवादी करत आहेत. या जागतिक मृदा दिवसध्या निमित्त्याने आपणही आपल्या परिसरातील भूभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवावा. त्याची निगा राखावी असा संकल्प करूया.

 
स्वप्ना अनिल वानखडे
वर्धा

ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.

    

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.