Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Friday
20-05-2022
Abhijeet Bharat Logo
पंजाब : पटियाला येथे महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हत्तीवर झाले स्वार कोलकाता : पंजाब पोलिसांकडून कोलकाता येथून पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक टेरर फंडिंग केस : एनआयए न्यायालयाने यासीन मलिक याला दोषी ठरवले. शिमला : धर्मशाला येथे अमेरिकेच्या विशेष दूताने तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची भेट घेतली गुजरात : मी अद्याप भाजपामध्ये नाही आणि जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही; हार्दिक पटेल यांची काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतरची प्रतिक्रिया
Abhijeet Bharat
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचे निधन!
04-Dec-2021, 6:42:34 pm
Edited by - Smruti Chobitkar
६७ वर्षीय ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा (Senior Journalist Vinod Dua) हे मीडियातील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी दूरदर्शनसाठी देखील काम केले. जवळपास ४२ वर्षांहून अधिक त्यांनी पत्रकारिता केली. (senior journalist vinod dua passes away)
Abhijeet Bharat

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मुलगी मल्लिका दुवा यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून विनोद दुवा आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मल्लिका दुवा यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की, 'एक निडर आणि असाधारण वडील विनोद दुवा यांचे निधन झाले आहे. ते आनंदात आपले जीवन जगले. दिल्लीतील एका निर्वासित वसाहतीमध्ये वाढले आणि ४२ वर्षे पत्रकारितेच्या जगतात स्वतःचे नाव कमावले. ते नेहमीच सत्येसाठी आवाज उचलत होते. आता ते आमच्या आईसोबत आहेत, आमची आई आणि त्यांची पत्नी चिन्ना आता स्वर्गात आहे. येथे ते गाणी गातील, जेवण बनवतील आणि एकत्र प्रवास करतील. त्यांच्या पार्थिवावर उद्या ५ डिसेंबर रोजी लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.'

Abhijeet Bharat

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची मुलगी मल्लिका दुवा यांनी विनोद दुवा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. त्यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहित म्हटले होते की, 'तिच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना करा.'

माध्यमांमधील एक प्रसिद्ध नाव
६७ वर्षीय विनोद दुवा हे मीडियातील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी दूरदर्शनसाठी देखील काम केले. जवळपास ४२ वर्षांहून अधिक त्यांनी पत्रकारिता केली. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेदरम्यान, विनोद दुवा आणि त्यांच्या पत्नीला गुरुग्राममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तेव्हापासून विनोद दुवा यांची प्रकृती ढासळत चालली होती.


अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.