Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
National Pollution Control Day 2021 : प्रदूषण नियंत्रण काळाची गरज
02-Dec-2021, 2:36:06 pm
Edited by - Smruti Chobitkar
National Pollution Control Day 2021 : औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याबाबत जागरूकता पसरवणे, औद्योगिक प्रक्रिया किंवा मानवी दुर्लक्षामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखणे, लोक आणि उद्योगांना प्रदूषण नियंत्रण कायद्यांच्या महत्त्वाविषयी जागरूक करणे ही राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाची मुख्य उद्दिष्टे आहेत.
Abhijeet Bharat

नागपूर : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा प्रदूषण रोखण्यासाठी तसेच निर्माणकर्ता निसर्गाचे प्रदूषणापासून संरक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. महत्वाचे म्हणजे १९८४ मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी २ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून पाळला जातो. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड (UCIL) कीटकनाशक प्लांटमध्ये २-३ डिसेंबरच्या रात्री मिथाइल आयसोसायनेट या प्राणघातक गॅसच्या गळतीमुळे ही भीषण औद्योगिक दुर्घटना घडली होती. या प्लांटमधील विषारी वायू पसरल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याबाबत जागरूकता पसरवणे, औद्योगिक प्रक्रिया किंवा मानवी दुर्लक्षामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखणे, लोक आणि उद्योगांना प्रदूषण नियंत्रण कायद्यांच्या महत्त्वाविषयी जागरूक करणे ही या दिवसाची मुख्य उद्दिष्टे आहेत. हवा, माती, ध्वनी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे देखील या दिवसाचा उद्देश आहे. देशातील सद्यस्थिती पाहता प्रदूषण नियंत्रणाच्या महत्त्वाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि प्रदूषण कसे टाळावे याबद्दल शिक्षित करणे, ही आजच्या काळाची गरज आहे.

नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडियाच्या डेटावरून असे दिसून आले आहे की, दरवर्षी सुमारे ७ दशलक्ष लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होते. जागतिक स्तरावर दहापैकी नऊ लोकांना स्वच्छ आणि सुरक्षित हवा उपलब्ध नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत तब्बल ९ शहरे भारतातील आहेत. काही ठिकाणी पार्टिक्युलेट मॅटर (PM) ची पातळी २०० पेक्षा जास्त आहे. नवी दिल्लीत वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयटीओजवळ दिल्ली पोलिस मुख्यालयात अँटी स्मॉग गन बसविण्यात आली आहे.

Abhijeet Bharat

कोरोना महामारीच्या काळात एनसीआर आणि देशातील सर्व शहरे आणि नगरे जेथील वातावरणीय हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळी अंतर्गत येते, अशा ठिकाणी सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने निर्देश दिले आहेत. फटाक्यांमुळे होत असलेल्या हवा आणि ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती, दमा, पक्षाघात, हृदयविकार इत्यादी आजारांनी ग्रस्त लोकांना अतिशय त्रास होतो. याशिवाय, मोकळे आणि पाळीव प्राणी, पक्षी देखील फटाक्यांच्या प्रदूषणामुळे त्रस्त होतात. 

मागील कित्येक वर्षांपासून देशाची राजधानी दिल्ली येथे Smog नामक प्रदूषण होत असल्याची ओरड आहे. शेजारच्या पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांद्वारे कापलेल्या धान्याचे कडबा-कुटार (फराली) जाळल्यामुळे हे प्रदूषण होते. यावर उपाय म्हणून वाहन धारकांसाठी odd and even ही वाहतूक पद्धती राबविण्यात आली. परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. समस्येचे मूळ एक आणि उपाय दुसरा होत असल्याने प्रदूषण नियंत्रणात येणार कसे? तसेच प्रत्येक घरी एअर प्युरिफायर वापरणे शक्य नाही. या प्रदूषणामुळे लोकांचे बाहेर जाणे अशक्य झाल्यामुळे दिल्लीतील शाळा बंद कराव्या लागल्या. पाण्याचे फवारे मारून smog ला क्षमावण्याचे उपाय अतिशय तोकडे ठरले.

तसेच गेल्या महिन्यात यमुना नदीवर छठ पूजेदरम्यान अक्षरशः फेसचा थर तरंगताना दिसला. हे जल प्रदूषणाचे ताजे उदाहरण आहे. या सगळ्या उदाहरणांमधून एक समज म्हणून सर्वांनी एकत्र येऊन वर्षभर प्रदूषण नियंत्रणासठी प्रयत्न करायला हवे. आपल्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हे अत्यावश्यक बनले आहे.

 

स्वप्ना अनिल वानखडे
वर्धा

ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.

  

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.