Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
काय सांगता खरंच!..किळसवाणे पण सत्य 'हा' आहे मानवी मिशीच्या केसांचा सूट
24-Nov-2021, 5:02:23 pm
Edited by - Pravin wankhede
जनावरांच्या फरपासून कपडे, सोफा कव्हर, कोच, बेल्ट आदी वस्तू तयार केल्या जातात हे सर्वश्रुत आहे. आजवर आपण कपड्यापासून किंवा लोकरीपासून कोट किंवा सूट तयार केल्याचे बघितले असेल. पण आता आम्ही तुम्हाला एका अशा सूटबद्दल सांगणार आहोत जे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल आणि असेही काही असू शकते याचे आश्चर्यही वाटेल.
Abhijeet Bharat

मेलबर्न: जनावरांच्या फरपासून कपडे, सोफा कव्हर, कोच, बेल्ट आदी वस्तू तयार केल्या जातात हे सर्वश्रुत आहे. आजवर आपण कपड्यापासून किंवा लोकरीपासून कोट किंवा सूट तयार केल्याचे बघितले असेल. पण आता आम्ही तुम्हाला एका अशा सूटबद्दल सांगणार आहोत जे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल आणि असेही काही असू शकते याचे आश्चर्यही वाटेल.

'माणसांच्या मिशांच्या केसांचा सूट' आश्चर्याचा धक्का बसला ना, पण हे खरं आहे. काही जणांना ही बाब किळसवाणे वाटेल पण पुरुषांच्या मिशांपासून सूट तयार करण्यात आला आहे. पॉलिटिक्स मेन्सवेअर ब्रँड या ऑस्ट्रेलियामधील मेन्सवेअर कंपनीने पुरुषांच्या मिशांच्या केसांपासून एक सूट तयार केला आहे.

Abhijeet Bharat

कंपनीने मेलबर्नच्या व्हिज्युअल आर्टिस्ट पामेला क्लिमन पासी यांच्यासोबत मिळून हा आगळा-वेगळा सूट तयार केला आहे. पॉलिटिक्स ब्रँडने हा सूट पुरुषांच्या मिशांच्या केसांपासून बनवला आहे. अनेकांना हा सूट बघायला विचित्र आणि किळसवाणा वाटतो. या सूटला 'कोमो हेअर सूट' असे नाव देण्यात आलं आहे.  या सुटला 'मोवेंबर' या कार्यक्रमात लाँच करण्यात आला आहे. 'मोवेंबर' हा असा कार्यक्रम दरवर्षी  नोव्हेबरमध्ये आयोजित केला जातो. कार्यक्रमादरम्यान, जगभरातील पुरुषांना त्यांच्या मिशा वाढवण्यास सांगितले जाते. पुरुषांमध्ये होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती  केल्या जाते.

सूट तयार करण्यासाठी  पामेला क्लिमन -पासीने खूप मेहनत घेतली असून, त्याने वेगवेगळ्या सलूनमधून मिशांचे केस गोळा केले आहेत. या प्रकल्पासाठी लोक त्याला मिशा कापल्यानंतर केसांचे पॅकेज पाठवत होते, पामेलाच्या पतीचा प्रोटेस्ट कॅन्सरने मृत्यू झाला होता. यानंतर त्यांनी पुरुषांमध्ये या आजाराबाबत जनजागृती सुरू केली.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.