Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
प्रदूषणामुळे होतेय फुफ्फुसांचे नुकसान; हे ८ खाद्यपदार्थ ठरतील उपयुक्त
23-Nov-2021, 11:05:08 am
Edited by - Smruti Chobitkar
प्रदूषणाच्या (Pollution) लहान कणांमुळे आपल्या फुफ्फुसांचे (Lungs) मोठे नुकसान होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी अतिशय फायदेशीर मानल्या जातात. (pollution causes damage to the lungs these 8 foods will be useful)
Abhijeet Bharat

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमधील लोकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. राजधानीतील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत खराब श्रेणीत आहे. केवळ दिल्लीच नाही तर देशातील अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. हवेत पसरणारे प्रदूषणाचे विष फुफ्फुसांसाठी अत्यंत नुकसानदायक आहे.

प्रदूषणाच्या लहान कणांमुळे आपल्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी अतिशय फायदेशीर मानल्या जातात. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी आणि आपल्या उत्तम आरोग्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास ते नक्की उपयुक्त ठरतील.

गूळ - फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी गूळ खूप फायदेशीर मानला जातो. याचा वापर करून तुम्ही प्रदूषण किंवा धुक्यामुळे होणाऱ्या समस्या टाळू शकता. गुळामध्ये असलेले अँटी-एलर्जिक घटक फुफ्फुसांसाठी चांगले असतात. त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्य करते आणि यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. दररोज गूळ खाल्ल्याने हवेत पसरणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही, हेही अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

Abhijeet Bharat

 

ऑलिव्ह ऑईल - ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन-ई प्रमाण अधिक असते,जे फुफ्फुसांची समस्या दूर करून त्याचे कार्य सुधारते. ऑलिव्ह ऑईलमध्ये आढळणारे फॅटी ॲसिड शरीरातील सूज कमी करते. याशिवाय, प्रदूषणामुळे होणार्‍या हृदयरोगाच्या समस्यांपासून देखील ते संरक्षण करते.

जवस (Flaxseed) - जवसमध्ये मोठ्या प्रमाणात फायटोस्ट्रोजेन्स आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिड आढळतात. फायटोस्ट्रोजेन्समध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे प्रदूषणामुळे होणारा दमा आणि ऍलर्जीपासून संरक्षण करतात. प्रदूषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जवस सर्वात प्रभावी ठरते. त्यामुळे प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर नियमित जवसचे सेवन करायला हवे.

हर्बल टी - वजन कमी करण्यापासून ते निरोगी राहण्यापर्यंत हर्बल-टी अनेक प्रकारे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबतच प्रदूषणामुळे होणार्‍या ऍलर्जीपासूनही संरक्षण मिळते.

टोमॅटो - प्रदूषणापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी टोमॅटोचा नियमित आहारात समावेश करा. यामध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या समस्यांपासून संरक्षण करते.

Abhijeet Bharat

 

पाणी - श्वासाद्वारे शरीरात पोहोचलेले प्रदूषणाचे विष बाहेर काढण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिण्यास विसरू नका. दिवसभरात किमान ४ लिटर पाणी प्या. घराबाहेर पडल्यावरही पाण्याची बॉटल सोबत ठेवा. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होईल आणि वातावरणातील विषारी वायू रक्तापर्यंत पोहोचले तरी कमी नुकसान होईल.

लसूण - लसणात अँटिबायोटिक तत्व असतात, जे प्रदूषणाशी लढण्याची क्षमता वाढवतात. त्यामुळे दररोज तुमच्या आहारात लसणाचाही समावेश करा.

व्हिटॅमिन सी - व्हिटॅमिन-सी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकते. शरीरात व्हिटॅमिन-ई पुन्हा निर्माण करण्यासाठी देखील व्हिटॅमिन-सी खूप उपयुक्त आहे. शरीरातील व्हिटॅमिन-सीची पातळी मेंटेन ठेवणे फुफ्फुसांसाठी खूप महत्वाचे आहे. शरीराला दररोज ४० मिलीग्राम व्हिटॅमिन-सीची आवश्यकता असते.चवळीची भाजी, शेवग्याच्या शेंगा, ओवा आणि पत्ताकोबी या भाज्या व्हिटॅमिन-सीचे चांगले स्रोत मानले जातात. तसेच लिंबू, पेरू, आवळा आणि संत्र्यामध्येही हे जीवनसत्व आढळते.

 

अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब तसेच ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करायला विसरू नका.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.