Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Abhijeet Bharat Logo

शोध सत्याचा...

Sunday
23-01-2022
Abhijeet Bharat Logo
अलास्का : आंद्रेनोफ बेटांच्या ६८१ किमी पूर्व उत्तर पूर्वेला सकाळी १०:४७ च्या सुमारास ६.० तीव्रतेचा भूकंप; नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे NCC प्रजासत्ताक दिन शिबिर २०२२ च्या सहभागींना संबोधन सुरु मुंबई : ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाजवळील २० मजली कमला इमारतीला लेव्हल ३ ची आग नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष एचडी देवगौडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात ३,३७,७०४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद; ४८८ जणांचा मृत्यू तर २,४२,६७६ जणांची कुरणावर मात
काळजी घ्या! गर्भपाताच्या औषधांमुळे बाळाला कर्करोग धोका
16-Nov-2021, 4:59:15 pm
Edited by - Pravin wankhede
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मानवाची जीवन पद्धती बदलत चालली आहे. अशात विविध आजारांचे प्रमाणही वाढत आहे. यात कर्करोगाचा धोका बालकांमध्ये वाढत आहे. याचे कारण एका अभ्यासातून पुढे आले आहे.
Abhijeet Bharat

नवी दिल्ली: सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात मानवाची जीवन पद्धती बदलत चालली आहे. अशात विविध आजारांचे प्रमाणही वाढत आहे. यात कर्करोगाचा धोका बालकांमध्ये वाढत आहे. याचे कारण एका अभ्यासातून पुढे आले आहे.

गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे गर्भाशयाच्या संपर्कात आल्याने नंतर होणार्‍या बाळाला कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. असे निष्कर्ष ह्यूस्टन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरच्या संशोधकांनी काढले आहे, गर्भपातासाठी वापरली जाणारी औषधे गर्भाशयाच्या संपर्कात आल्याने नंतर होणार्‍या बाळाला कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. गर्भपाताच्या औषधांमुळे सिंथेटिक हार्मोन्ससारखे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. या औषधाचा गर्भाशयातील गर्भाचा संपर्क झाला तर पुढे हीच बाब जन्माला आल्यानंतर बर्‍याच वर्षांनीही अपत्यांना कॅन्सरचा धोका उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. सहयोगी प्राध्यापक कॅटलिन सी. मर्फी यांनी वृत्तसंस्थांना सांगितले की, गर्भधारणेदरम्यान औषध घेतलेल्या स्त्रियांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये हे औषध न घेतलेल्या स्त्रियांच्या जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत त्यांच्या कर्करोगाचे प्रमाण दुप्पट आहे.

असा झाला अभ्यास

गर्भपाताच्या औषधांमुळे सिंथेटिक हार्मोन्ससारखे साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. या औषधाचा गर्भाशयातील गर्भाचा संपर्क झाला तर पुढे हीच बाब जन्माला आल्यानंतर बर्‍याच वर्षांनीही अपत्यांना कॅन्सरचा धोका उद्भवण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. १७-ओएचपीसी हे औषध एक कृत्रिम प्रोजेस्टोजेन आहे. जे १९५0 आणि १९६0 च्या दशकात महिलांनी वारंवार वापरले होते आणि आजही महिलांना मुदतपूर्व जन्म रोखण्यासाठी हे औषध दिले जाते.

प्रोजेस्टेरॉन गर्भधारणेदरम्यान गर्भ वाढण्यास मदत करते आणि स्त्रीला प्रसूतीकळा लवकर येण्याला अडचणी निर्माण करतात यामुळे गर्भपाताचा धोका उद्भवतो. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकन र्जनल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहेत. या शोधादरम्यान संशोधकांनी जून १९५९ ते जून १९६७ दरम्यान प्रसूतीपूर्व काळजी घेतलेल्या महिलांवरील डेटा आणि कॅलिफोर्निया  कॅन्सर रजिस्ट्रीमधील डेटाचे पुनरावलोकन केले. यात त्या काळात जन्मलेल्या आणि २0१९ पयर्ंत जिवंत असलेल्या व्यक्तिंमध्ये कर्करोगाचे संशोधन केले. यातील १८,७५१ पेक्षा जास्त जिवंत असलेल्या लोकांपैकी १ हजार ८ जणांना कर्करोगाचे निदान झाल्याचे आढळले. त्यात २३४ नवजात अपत्यांना गर्भात असतानाच १७-ओएचपीसीचा धोका उद्भवला. गर्भधारणा काळात ही औषधे घेतल्याने भविष्यात कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण संशोधक मर्फी यांनी नोंदवले.गर्भधारणेदरम्यान हे औषध घेतल्याने बाळांचा लवकर विकास होण्यात व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे काही दशकांनंतर कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे आमचे निष्कर्ष सूचित करतात. १७-ओएचपीसीचा कोणताही फायदा नाही आणि ते वेळेआधीच बाळाच्या जन्माचा धोकाही कमी करत नाही, असे मर्फी म्हणतात.

अभिजीत भारत हे मराठी व हिंदी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन पोर्टल' आहे. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या घडामोडी, राजकीय वेध व मनोरंजन विश्वातील हालचालींचा मागोवा, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख प्रकाशित करणे हेच पोर्टलचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन अशा विविध विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा अभिजीत भारतचा कटाक्ष आहे.